मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samantha Prabhu: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार नागा चैतन्य आणि समंथा! ‘या’ चित्रपटात झळकणार

Samantha Prabhu: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार नागा चैतन्य आणि समंथा! ‘या’ चित्रपटात झळकणार

Nov 11, 2022, 12:09 PM IST

    • Samantha Prabhu-Naga Chaitanya: साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Naga And Samantha

Samantha Prabhu-Naga Chaitanya: साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

    • Samantha Prabhu-Naga Chaitanya: साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Samantha Prabhu-Naga Chaitanya: साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांबद्दलचे अपडेट्स जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता ही बातमी समोर आल्यानंतर या जोडीचे चाहते खूप खूश झाले आहेत. घटस्फोटानंतर दोघांनी एकमेकांचे नाव घेणे देखील सोडले होते. मात्र, समंथा आजारी असल्याचे कळताच, नागाने तिला फोन केला. त्याने तिच्या तब्येतीची चौकशी केली. त्यामुळे आता असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी या जोडीला नवीन प्रोजेक्टसाठी संपर्क साधला आहे. जर, दोघांनीही सहमती दर्शवली तर समंथा आणि नागाला पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

अभिनेत्री समंथाने काही काळापूर्वी आपण 'मायोसिटिस' नावाच्या आजाराशी लढा देत असल्याची माहिती दिली होती. अभिनेत्री या आजारावर उपचार घेत आहे. लवकरच समंथा रुथ प्रभू ‘यशोदा’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. आजारी असतानाही अभिनेत्री या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान समंथा आणि नागा चैतन्य एका प्रोजेक्टसाठी एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एका नव्या साऊथ चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्यांना विचारणा केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप यावर दोघांकडून कोणतीची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सध्या समंथा एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्री तिच्या या आजाराच्या चर्चांमुळे सध्या प्रसिद्धी झोतात आली होती. दरम्यान नागा चैतन्यने तिच्या काळजीपोटी तिला फोन केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपली पूर्वाश्रमीची पत्नी समंथा प्रभू आजारी असल्याचे कळताच अभिनेता नागा चैतन्यने सगळे रुसवेफुगवे बाजूला सारत, तिची फोनवरून चौकशी केली. अभिनेत्याच्या या कृतीमुळे त्याचे खूप कौतुक झाले.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

पुढील बातम्या