मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salim Khan: सलिम खान यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न का केलं? 'हे' होतं कारण

Salim Khan: सलिम खान यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न का केलं? 'हे' होतं कारण

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 02, 2023, 10:00 AM IST

    • Salim Khan Marriage: पहिल्या पत्नीला चार मुले असतानाही सलीम खान यांनी दुसरे लग्न केले. आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये दुसरे लग्न का केले हे सांगितले आहे.
हेलन आणि सलीम खान (HT)

Salim Khan Marriage: पहिल्या पत्नीला चार मुले असतानाही सलीम खान यांनी दुसरे लग्न केले. आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये दुसरे लग्न का केले हे सांगितले आहे.

    • Salim Khan Marriage: पहिल्या पत्नीला चार मुले असतानाही सलीम खान यांनी दुसरे लग्न केले. आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये दुसरे लग्न का केले हे सांगितले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय लेखक म्हणून सलीम खान हे ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली आहे. पण सलीम खान यांच्या प्रफोशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफ देखील कायम चर्चेत होती. त्यांनी दोन लग्न केली. त्यांच्या पहिल्या बायकोचे नाव सलमा आणि दुसऱ्या हेलन. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरे लग्न का केले यामागचा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सलीम खान यांनी 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनपेक्षीतपणे हेलनच्या प्रेमात पडल्याचा खुलासा केला. 'ज्यावेळी हेलनला काम मिळत नव्हते तेव्हा ती माझ्याकडे आली आणि तिने काम मागितले. काही दिवसातच मी तिला तीन चित्रपटाच्या ऑफर दिल्या. त्यानंतर तिचे येणे-जाणे सुरु झाले' असे सलीम खान म्हणाले.
वाचा: अंघोळ करतानाच्या फोटोमुळे मिताली मयेकर झाली ट्रोल, आता उचलले मोठे पाऊल

पुढे ते म्हणाले की, 'जर एखाद्या पुरुषाने असे केले तर त्याच्या समोरच्याकडून काही अपेक्षा असतात. ती तरुण होती आणि मी देखील तरुण होतो. माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी फक्त तिची मदत केली होती. ती माझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करु लागली होती. मी नेहमी म्हणत असतो आदर करणे हे प्रेमाचे प्रतिक आहे. जी व्यक्ती तुमचा आदर करत नाही तुम्ही तिच्यावर प्रेम करु शकत नाही.'

पुढे हेलन विषयी बोलताना सलीम खान म्हणाले, 'तिचा आदर प्रेमात बदलत गेला. समस्या ही होती की तिचे कोणीच नव्हते. तिचा एक भाऊ होता त्याचे देखील निधन झाले होते. त्यामुळे हेलनला लांब करणे माझ्यासाठी त्रासदायक होते. मी आईसमोर हेलनसोबत असलेल्या नात्याची कबूली दिली होती. हा एक भावनिक निर्णय होता. त्यांनाही याची जाणीव झाली होती. आमचा लग्न करण्याचा कोणताही इरादा नव्हता. पण मी गोष्टी योग्य पद्धतीने सांभाळल्या आणि मग लग्न केले.'

सलीम खान यांनी एक अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी तिसरी मंजिल, शराबी लुटेरा आणि दिवाना या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेले चित्रपट हिट ठरत होते. १९८१ साली त्यांनी हेलन यांच्याशी लग्न केले. त्यापूर्वी त्यांनी १९६४ साली सलमा यांच्याशी लग्न केले होते.

विभाग

पुढील बातम्या