मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sairat: खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...;‘सैराट’ फेम सूरज पवारची पोस्ट

Sairat: खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...;‘सैराट’ फेम सूरज पवारची पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 03, 2022, 02:08 PM IST

    • Suraj Pawar Facebook Post: सैराट चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सुरडला कोणत्याही क्षणी अटक होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्याने पोस्ट शेअर करत याविषयी वक्तव्य केले आहे.
सूरज पवार (HT)

Suraj Pawar Facebook Post: सैराट चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सुरडला कोणत्याही क्षणी अटक होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्याने पोस्ट शेअर करत याविषयी वक्तव्य केले आहे.

    • Suraj Pawar Facebook Post: सैराट चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सुरडला कोणत्याही क्षणी अटक होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्याने पोस्ट शेअर करत याविषयी वक्तव्य केले आहे.

काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटली तरी प्रेक्षक ते आवडीने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे २०१६ साली प्रदर्शित झालेला 'सैराट.' या आर्चीचा भाऊ प्रिन्स सध्या चर्चेत आहे. प्रिन्स ही भूमिका अभिनेता सुरज पवारने साकारली होती. पण गेल्या काही दिवसांपासून सूरजला कधीही अटक होण्याची शक्यता आहे असे म्हटले जात होते. आता सूरजने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सूरजने एक धक्कादायक प्रकार केल्याची माहिती समोर आली होती. त्याने मंत्रालयात नोकरी देतो हे सांगून शिर्डीमधील एका व्यक्तीची फसवणूक केली. नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर सूरजला अटक होणार असल्याचे म्हटले जात होते. आता सूरजने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: दाक्षिणात्य सुपरस्टार विजयसोबत दिसणार मराठमोळा सिद्धार्थ जाधव, टीझर प्रदर्शित

सूजरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, 'नमस्कार मी सूरज पवार, गेले दहा पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच‌ मीडियाने माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहुरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलिसांसमोर सर्व कागदपत्रांसह माझे म्हणणे नमुद केले. त्यानंतर वेळोवेळी राहुरी पोलीस सांगतील त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहिल्यांदा हजर राहिलो आणि बाहेर मिडीयात 'प्रिन्सला पोलीसांनी केली अटक! प्रिन्स खाणार जेलची हवा! प्रिन्स अखेर जेरबंद!' या अशा मधळ्याच्या बातम्या देऊन प्रिंट आणि डिजिटल मिडीयाने कुठलीही शहानिशा न करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं' असे म्हटले.

पुढे तो म्हणाला, खरे पाहाता राहुरी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहिलं होतं. परंतू प्रत्येक्षात ते मला कधीच भेटले नव्हते. राहुरी पोलीस‌ स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्याबाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचावाचा हेतू ठेवून माझे नाव घेतले होते. हे पोलिसांसमोर सिद्ध झालं. पोलीस अधिकारी श्री. दराडेसाहेब आणि श्री. सज्जनकुमार नऱ्र्हेडा आणि पोलीस टीमने सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं 'किटाळ' एकदाचं संपलं.'

सूरजने खंत व्यक्त करत म्हटले की, 'पण यामध्ये झालेली मानहानी हे नुकसान कधी भरून येणारं आहे. माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास या प्रकरणातून उडाला. असंख्य जवळची माणसे आणि नाती माझ्यापासून दुर गेली. पाच महिन्यापूर्वी माझे लग्न झाले. त्यानंतर आलेल्या या बालंटानंतर माझी पत्नी व तिच्या घरच्यांची परिस्थिती न सांगितलेली बरी. या प्रकरणानंतर सुखाच्या काळात माझ्या सोबत मज्जा मस्ती करणारे एकही मित्र या पडत्या काळात मदतीला धावले नाहीत. पण काही जवळच्या चार लोकांनी मला धीर देऊन या संकटात मदत केली त्यांचा शतश: ॠणी आहे! माझ्यावर आलेल्या संकटात प्रिंट आणि डिजिटल मिडीयाने भरभरून जनतेसमोर सादर केलं पण या प्रकरणातून सहीसलामत सुटल्यानंतर त्याची कुठल्यातरी प्रिंट आणि डिजिटल मिडीयाने चार ओळीची नोंद सुध्दा घेतली नाही. सूरज पवार, पोपळज ता. करमाळा जि. सोलापूर'

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना मंत्र्यालयातून फोन आल्याचे भासवण्यात आले. त्यांना आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील असे फोनवर सांगण्यात आले. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या असं फोनवरील व्यक्तीने सांगितले.

विभाग

पुढील बातम्या