मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा 'पॉंडीचेरी' चित्रपट पाहायचा? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा 'पॉंडीचेरी' चित्रपट पाहायचा? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 22, 2023, 02:20 PM IST

    • Pondicherry: स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'पॉंडीचेरी' हा भारतातातील पहिला चित्रपट ठरला होता.
पॉंडीचेरी (HT)

Pondicherry: स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'पॉंडीचेरी' हा भारतातातील पहिला चित्रपट ठरला होता.

    • Pondicherry: स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'पॉंडीचेरी' हा भारतातातील पहिला चित्रपट ठरला होता.

मागील वर्षी मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांना मनोरंजनात्मक, वैविध्यपूर्ण आशयाचे अनेक चित्रपट दिले. त्यापैकीच पॉंडीचेरी , तमाशा लाईव्ह, सहेला रे. या प्रत्येक चित्रपटाची काहीतरी खासियत आहे. स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'पॉंडीचेरी' हा भारतातातील पहिला चित्रपट ठरला असून पत्रकारांची ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची पळापळ, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा अधोरेखित करणारा.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगीतिक मेजवानी आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा ही गाण्यांच्या माध्यमातून पुढे जाते. तर आयुष्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना गृहीत धरत नात्यातील हरवून गेलेला गोडवा पुन्हा मिळवण्यासाठीची ‘ती’ची धडपड 'सहेला रे' मध्ये दिसत आहे. असे विविध जॉनरचे हे चित्रपट प्रेक्षकांना एकाच ठिकाणी म्हणजेच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहेत.
वाचा: सामानसह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत...; उर्फीचे ट्वीट व्हायरल

ज्यांचे प्लॅनेट मराठीचे सबस्क्रिप्शन आहे त्यांना हे चित्रपट पाहता येतीलच. याव्यतिरिक्त हे चित्रपट व्हिडिओ ॲान डिमांड अंतर्गत असल्याने एक ठराविक रक्कम भरून आपल्याला आवडणाऱ्या चित्रपटांचा प्रेक्षकांना इथे आनंद घेता येणार आहे.

'पॉंडीचेरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, नीना कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर 'सहेला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी प्रमुख भूमिकेत आहेत.

पुढील बातम्या