मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  RRR Movie: ‘नाटू नाटू’चा पुन्हा मोठा धमाका! ‘गोल्डन ग्लोब’नंतर पटकावला ‘हा’ मानाचा पुरस्कार

RRR Movie: ‘नाटू नाटू’चा पुन्हा मोठा धमाका! ‘गोल्डन ग्लोब’नंतर पटकावला ‘हा’ मानाचा पुरस्कार

Jan 16, 2023, 12:00 PM IST

    • Naatu Naatu Song Award: पुन्हा एकदा 'RRR' ने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. ‘गोल्डन ग्लोब’नंतर आणखी एका मानाच्या पुरस्कारावर या चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे.
Naatu Naatu Song

Naatu Naatu Song Award: पुन्हा एकदा 'RRR' ने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. ‘गोल्डन ग्लोब’नंतर आणखी एका मानाच्या पुरस्कारावर या चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे.

    • Naatu Naatu Song Award: पुन्हा एकदा 'RRR' ने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. ‘गोल्डन ग्लोब’नंतर आणखी एका मानाच्या पुरस्कारावर या चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे.

Naatu Naatu Song Award: साऊथ अभिनेते ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने नुकताच ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार पटकावला आहे. यानंतर पुन्हा एकदा एका मोठ्या मानाच्या पुरस्कारावर या चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे. पुन्हा एकदा 'RRR' ने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर राजामौली यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ‘क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड’ देण्यात आला आहे. हा पुरस्कार देखी 'नाटू नाटू' या गाण्याने पटकावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

जगभरातील अनेक चित्रपटांना मागे टाकत ‘आरआरआर’ने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स पटकावला आहे. ‘वेयर द क्राउड सिंग’, ‘गुईलमेरी देल टोरो पिनाचीयो’, 'टॉप गन: मॅवरिक', 'ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर' आणि 'व्हाईट नॉइस' या चित्रपटांशी ‘आरआरआर’चा सामना होता. मात्र या सगळ्यांना मागे टाकत एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'ने बाजी मारली आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटाने आणखी एका विभागात पुरस्कार पटकावला आहे. 'आरआरआर' ला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही मिळाला आहे. या विभागांत 'ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट', 'अर्जेंटिना १९८५', 'बार्डो', 'फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ डँडफुल ऑफ ट्रुथ्स', 'क्लोज' आणि 'डिसीजन टू लीव्ह' या चित्रपटांशी ‘आरआरआर’ची स्पर्धा होती. या सर्व चित्रपटांना मागे टाकत ‘आरआरआर’ने पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे जगभरात खूपच गाजले आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहेत.

विभाग

पुढील बातम्या