मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: जिनिलीया पुन्हा आई होणार? व्हायरल व्हिडीओवर अखेर रितेश देशमुखने दिले स्पष्टीकरण! म्हणाला...

Riteish Deshmukh: जिनिलीया पुन्हा आई होणार? व्हायरल व्हिडीओवर अखेर रितेश देशमुखने दिले स्पष्टीकरण! म्हणाला...

Sep 11, 2023, 01:21 PM IST

  • Riteish Deshmukh Reacts Genelia Pregnancy: रितेश देशमुखने जिनिलीया प्रेग्नंट असल्याच्या व्हायरल चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Riteish Deshmukh Reacts Genelia Pregnancy

Riteish Deshmukh Reacts Genelia Pregnancy: रितेश देशमुखने जिनिलीया प्रेग्नंट असल्याच्या व्हायरल चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Riteish Deshmukh Reacts Genelia Pregnancy: रितेश देशमुखने जिनिलीया प्रेग्नंट असल्याच्या व्हायरल चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Riteish Deshmukh Reacts on Genelia Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया डिसुझाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच वाटू लागले होते की, अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार आहे. मात्र, आता रितेश देशमुखने या व्हायरल चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर त्याने आपल्या खास अंदाजात सगळ्यांना उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

जिनिलीया डिसुझाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये जिनिलीया आणि तिचा पती-अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत एका कार्यक्रमात दिसली होती. यावेळी जेव्हा दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी आले, तेव्हा लोकांनी त्यांना पाहून अंदाज बांधला की, अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने फोटो पोज देताना पोटावर हात ठेवला होता. तर, या कार्यक्रमात रितेश तिची काळजी घेताना दिसला होता. अशा स्थितीत जिनिलीया पुन्हा एकदा आई होणार असल्याचा अंदाज लोक बांधू लागले होते. या व्हिडीओमध्ये जिनिलीया जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Riteish Deshmukh Post

या व्हिडीओंमध्ये रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसुझा एकत्र खूप क्यूट दिसत होते. मात्र, यावेळी अभिनेता रितेश देशमुख पत्नीचा हात धरून तिची काळजी घेताना दिसला होता. यावेळी जांभळ्या मिनी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या जिनिलीयाला पाहून लोकांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचे चाहते म्हणत होते. दरम्यान जिनिलीया देखील सतत आपल्या पोटावर हात ठेवताना दिसल्याने या चर्चांना हवा मिळाली होती.

या चर्चा सोशल मीडियावर आगीसारख्या पसरत असताना, आता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये, त्याने त्याची पत्नी जिनिलीया डिसूझाच्या गरोदरपणाबद्दल अंदाज लावणाऱ्या एका पोर्टलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्टोरी पोस्टमध्ये त्याने लिहिले होते, 'आणखी २-३ असायला माझी काही हरकत नाही. पण, दुर्दैवाने हे खोटे आहे'. अर्थात त्यांच्याकडे काहीही गुडन्यूज नसल्याचे रितेश देशमुखने स्पष्ट केले आहे.

पुढील बातम्या