मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jawan: शाहरुखच्या ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडणार? बॉलिवूडचे ‘हे’ आगामी चित्रपट किंग खानला तगडी टक्कर देणार!

Jawan: शाहरुखच्या ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडणार? बॉलिवूडचे ‘हे’ आगामी चित्रपट किंग खानला तगडी टक्कर देणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Sep 11, 2023 12:15 PM IST

Upcoming Big Budget Movies after Jawan: येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या मेगा बजेट चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटांकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Jawan
Jawan

Upcoming Big Budget Movies after Jawan: सध्या बॉक्स ऑफिसवर केवळ ‘जवान’ची हवा पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. ‘जवान’ या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांत ५०० कोटींचा गल्ला जमवत एक मोठा रेकॉर्ड सेट केला आहे. पण, आता शाहरुख खानच्या या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकतील असे एक-दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात शाहरुख खानच्या स्वतःच्या एका चित्रपटाचा देखील समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चित्रपट विश्लेषक सुमित कडेल यांनी येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या मेगा बजेट चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या चित्रपटांकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. साहजिकच चित्रपटाच्या कथानकांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. परंतु, या सगळ्याच आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटांबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या पाच चित्रपटांपैकी एक चित्रपट शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा विक्रम मोडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sooraj Pancholi: जिया खानच्या मृत्यूनंतर सूरज पांचोली पुन्हा पडलाय प्रेमात! कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती?

या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत सुपरस्टार सलमान खानचा 'टायगर ३' चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर, या चित्रपटाचा आशय चांगला असेल तर, दिवाळीला येणारा हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करू शकतो, असे म्हटले जात आहे. नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये सांगण्यात आले आहे की, या चित्रपटाची कथा समजून घेण्यासाठी, प्रेक्षकांना प्रथम 'वॉर', 'पठान' आणि 'टायगर जिंदा है' हे चित्रपट पाहणे आवश्यक आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला आणि सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट 'डंकी' तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाविषयी अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 'पठान' आणि 'जवान' या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असे म्हटले जात आहे. या यादीतील पुढचा चित्रपट हृतिक रोशन स्टारर ‘फायटर’ आहे. हृतिकचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. तर, पाचव्या क्रमांकावर ईदला येत असलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा समावेश आहे.

WhatsApp channel