मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिकच्या लग्नात आयेशा आणणार विघ्न! ‘रंग माझा वेगळा’मध्ये मोठा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिकच्या लग्नात आयेशा आणणार विघ्न! ‘रंग माझा वेगळा’मध्ये मोठा ट्वीस्ट

Jan 18, 2023, 03:08 PM IST

    • Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एकीकडे दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचा भव्य सोहळा सुरू आहे. तर, दुसरीकडे आयेशा त्यांच्या लग्नात विघ्न आणण्याचं काम करत आहे.
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एकीकडे दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचा भव्य सोहळा सुरू आहे. तर, दुसरीकडे आयेशा त्यांच्या लग्नात विघ्न आणण्याचं काम करत आहे.

    • Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एकीकडे दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचा भव्य सोहळा सुरू आहे. तर, दुसरीकडे आयेशा त्यांच्या लग्नात विघ्न आणण्याचं काम करत आहे.

Rang Maza Vegla: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचा भव्य सोहळा सुरू आहे. तर, दुसरीकडे आयेशा त्यांच्या लग्नात विघ्न आणण्याचं काम करत आहे. या दरम्यान आता आयेशा एका अशी खेळी खेळणार आहे, ज्यामुळे दीपा आणि कार्तिकच्या लग्नात आता मोठा अडथळा निर्माण होणार आहे. या भव्य लग्नसोहळ्यात आयेशा आता सगळ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

दीपा आणि कार्तिक यांच्या लग्नात सप्तपदी सुरू असताना संतापलेल्या आयेशाने समई खाली पाडून आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. या समईमुळे लागलेल्या आगीत आता लग्नाचा मांडव जाळून खाक होणार आहे. यात आता दीपा-कार्तिकचं लग्न तर लांबणार आहेच. मात्र, आयेशाची ही खेळी आता इनामदार कुटुंबाच्या जीवावर बेतणार आहे. दीपा आणि कार्तिकचे लग्न थांबवण्यासाठी आयेशा काहीही करण्याच्या तयारीत आहे. मात्र, आता तिच्या या खेळात ती अडकणार की, दीपा आणि कार्तिकच्या लग्नात आणलेला हा अडथळा सगळ्यांच्याच जीवावर बेतणार हे आता येत्या भागांमध्ये कळणार आहे.

दीपा-कार्तिकच्या लग्नाची धामधूम सुरु असली तरी लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न आयेशा शेवटपर्यंत करणार आहे. सगुणा आजीचा वेष धारण करुन आलेल्या आयेशाचा हा प्लॅन यशस्वी होणार का, हे पहाणं उत्सुकतेचं असेल. गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते, तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आला आहे. आपापसातले हेवेदावे विसरुन दीपा-कार्तिक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकत आहेत. मेहंदी, हळद आणि संगीत साग्रसंगीत पद्धतीने पार पडल्यानंतर आता या\ विवाहसोहळ्याकडे साऱ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

पुढील बातम्या