मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: श्वेताला सगळा डाव कळणार! दीपा कार्तिकचा प्लॅन फसणार? मालिकेत येणार ट्विस्ट

Rang Maza Vegla: श्वेताला सगळा डाव कळणार! दीपा कार्तिकचा प्लॅन फसणार? मालिकेत येणार ट्विस्ट

Aug 31, 2023, 04:54 PM IST

  • Rang Maza Vegla latest episode 31 August 2023: श्वेताने हा प्लॅन ऐकल्यानंतर आता ती सगळं सत्य जाऊन आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे सौंदर्या इनामदार आयेशाला विश्वासात घेऊन सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Rang Maza Vegla latest episode 31 August 2023

Rang Maza Vegla latest episode 31 August 2023: श्वेताने हा प्लॅन ऐकल्यानंतर आता ती सगळं सत्य जाऊन आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे सौंदर्या इनामदार आयेशाला विश्वासात घेऊन सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Rang Maza Vegla latest episode 31 August 2023: श्वेताने हा प्लॅन ऐकल्यानंतर आता ती सगळं सत्य जाऊन आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे सौंदर्या इनामदार आयेशाला विश्वासात घेऊन सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Rang Maza Vegla latest episode 31 August 2023:रंग माझा वेगळा’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, शेवटच्या दोन-तीन भागात देखील प्रेक्षकांना धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. आता दीपा आणि कार्तिक यांचा प्लॅन आता फसण्याची शक्यता वाढली आहे. श्वेताला दीपा आणि कार्तिकचा सगळा प्लॅन कळणार आहे. दीपा आणि कार्तिक खोटं नाटक करत आहेत, असा संशय सुरुवातीपासूनच श्वेताला होता. या सगळ्यात तिने सगळ्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. अखेर दीपा कार्तिकी आणि दीपिकाला सगळा प्लॅन समजावून सांगत असताना श्वेताने ऐकला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

श्वेताने हा प्लॅन ऐकल्यानंतर आता ती सगळं सत्य जाऊन आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे सौंदर्या इनामदार मात्र आयेशाला विश्वासात घेऊन सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिचा हा डाव आता श्वेता उधळून लावणार आहे. हे सगळं नाटक असून, तुझं आणि कार्तिकचं लग्न कधीच होणार नाही, असं श्वेता आयेशाला सांगणार आहे. दुसरीकडे, आपण मांडवात कार्तिकचा खोटा खून करणार असल्याचा डाव दीपाने तिच्या मुलींना सांगितला आहे.

Tula Shikvin Changlach Dhada: अखेर अक्षरा बांधणार अधिपतीशी लग्नगाठ; आठवडाभर रंगणार साखरपुड्याचा सोहळा

आयेशा मागील काही वर्षांपासून स्वतःच्या एका काल्पनिक विश्वात जगत आहे. तिला मानसिक धक्का बसल्याने तिची स्मृती काही अंशी नष्ट झाली आहे. मात्र, तिला यातून बाहेर काढायचे असेल, तर एखादा मोठा झटका देणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता दीपा कार्तिकच्या जीव घेण्याचं नाटक रचणार आहे. यामुळे तरी आयेशाला धक्का बसेल आणि ती पुन्हा पूर्ववत होतील, असे दीपाला वाटत आहे.

सगळे प्रयत्न करून देखील आयेशा खरं सांगत नाहीये हे कळल्यावर आता दीपा कार्तिकच्या मृत्यूचा डाव रचणार आहे. यादरम्यान आता ती इनामदारांच्य घरात मोठा तमाशा करणार आहे. दीपा आयेशाला घराबाहेर निघून जायला सांगणार आहे. मात्र, यावेळी कार्तिक आयेशाच्या बचावासाठी पुढे येण्याचं नाटक करणार आहे. आयेशा या घरातून कुठेही जाणार नाही, असे कार्तिक म्हणणार आहे. तर, मी तुला घटस्फोट देऊन आयेशाशी लग्न करणार, असे देखील तो बोलणार आहे. तर, यावेळी दीपा त्याला जीवे मारण्याची धमकी देणार आहे.

पुढील बातम्या