Rang Maza Vegla Actress Vidisha Mhaskar: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे. एकीकडे मालिकेचा शेवट होत असताना दुसरीकडे कलाकार देखील भावूक होत आहेत. यानिमित्ताने कलाकार देखील व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी आता या मालिकेतील अनुभव आणि शूटिंगचे किस्से शेअर केले आहेत. या मालिकेतील कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर मालिकेतील काही सीन्स शेअर करत चाहत्यांना या प्रवासाची झलक दाखवली आहे. या मालिकेत खल भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर ही देखील आपल्या पात्राविषयी भरभरून व्यक्त झाली आहे.
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका २०१९मध्ये सुरू झाली होती. गेली ४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मात्र, आता शेवटाची वेळ आली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेत खलनायिका ‘आयेशा’ साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर देखील घराघरांत पोहोचली आहे. नुकतीच तिने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत विदिशा तिच्या ‘आयेशा’ या पात्राविषयी भरपूर बोलली आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत विदिशाने ‘आयेशा’ ही भूमिका इतकी भन्नाट साकारली की, लोकांनी तिला अक्षरशः दूषणं दिली. मात्र, प्रेक्षकांचा राग हेच तिच्या पात्राचे यश होते. प्रेक्षकांनी तिला देखील भरभरून प्रेम दिले. यावेळी मुलाखतीत विदिशाला असा प्रश्न करण्यात आला की, तू ‘आयेशा’ या पात्राकडून काय घेशील? यावर तिने छान उत्तर दिले आहे.
मालिकेत खलनायिका साकारात असल्याने विदिशा म्हणाली की, आयेशाकडून शिकावं किंवा तिच्याकडून एखादा गुण घ्यावा असं काहीच नाही. पण, जर मी आयेशाकडून काही गुण घेतले तर माझ्या आयुष्यातील सगळी माणसंच उद्ध्वस्त होतील. पण, आयेशाकडून घ्यावा असा एक गुण आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं हा गुण मी आयेशाकडून नक्की घेईन. कारण, आयेशा कार्तिकवर जितकं प्रेम करते, तेव्हढं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कुणावरही केलेले नाही. त्यामुळे मी तिच्यासारखं प्रेम करायला नक्की शिकेन.’
संबंधित बातम्या