मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: ‘आयेशा’कडून कोणता गुण घेशील? ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री विदिशा म्हणते...

Rang Maza Vegla: ‘आयेशा’कडून कोणता गुण घेशील? ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री विदिशा म्हणते...

Aug 31, 2023, 10:17 AM IST

  • Rang Maza Vegla Actress Vidisha Mhaskar: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत खल भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर ही देखील आपल्या पात्राविषयी भरभरून व्यक्त झाली आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Actress Vidisha Mhaskar: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत खल भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर ही देखील आपल्या पात्राविषयी भरभरून व्यक्त झाली आहे.

  • Rang Maza Vegla Actress Vidisha Mhaskar: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत खल भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर ही देखील आपल्या पात्राविषयी भरभरून व्यक्त झाली आहे.

Rang Maza Vegla Actress Vidisha Mhaskar: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे. एकीकडे मालिकेचा शेवट होत असताना दुसरीकडे कलाकार देखील भावूक होत आहेत. यानिमित्ताने कलाकार देखील व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी आता या मालिकेतील अनुभव आणि शूटिंगचे किस्से शेअर केले आहेत. या मालिकेतील कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर मालिकेतील काही सीन्स शेअर करत चाहत्यांना या प्रवासाची झलक दाखवली आहे. या मालिकेत खल भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर ही देखील आपल्या पात्राविषयी भरभरून व्यक्त झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका २०१९मध्ये सुरू झाली होती. गेली ४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मात्र, आता शेवटाची वेळ आली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेत खलनायिका ‘आयेशा’ साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर देखील घराघरांत पोहोचली आहे. नुकतीच तिने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत विदिशा तिच्या ‘आयेशा’ या पात्राविषयी भरपूर बोलली आहे.

Sunny Deol: सनी देओलला झालाय गंभीर आजार! लहानपणापासूनच करतोय संघर्ष; आता म्हणतो...

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत विदिशाने ‘आयेशा’ ही भूमिका इतकी भन्नाट साकारली की, लोकांनी तिला अक्षरशः दूषणं दिली. मात्र, प्रेक्षकांचा राग हेच तिच्या पात्राचे यश होते. प्रेक्षकांनी तिला देखील भरभरून प्रेम दिले. यावेळी मुलाखतीत विदिशाला असा प्रश्न करण्यात आला की, तू ‘आयेशा’ या पात्राकडून काय घेशील? यावर तिने छान उत्तर दिले आहे.

मालिकेत खलनायिका साकारात असल्याने विदिशा म्हणाली की, आयेशाकडून शिकावं किंवा तिच्याकडून एखादा गुण घ्यावा असं काहीच नाही. पण, जर मी आयेशाकडून काही गुण घेतले तर माझ्या आयुष्यातील सगळी माणसंच उद्ध्वस्त होतील. पण, आयेशाकडून घ्यावा असा एक गुण आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं हा गुण मी आयेशाकडून नक्की घेईन. कारण, आयेशा कार्तिकवर जितकं प्रेम करते, तेव्हढं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कुणावरही केलेले नाही. त्यामुळे मी तिच्यासारखं प्रेम करायला नक्की शिकेन.’

पुढील बातम्या