Rang Maza Vegla Latest Episode 30 August 2023: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक प्रयत्न करूनही आयेशा खरं बोलत नाहीये, हे लक्षात आल्यानंतर आता दीपा तिचा नवा प्लॅन सुरू करणार आहे. आयेशा गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या विश्वात जगात आहे. तिला मानसिक धक्का बसल्याने तिची स्मृती काही अंशी नाहीशी झाली आहे. मात्र, तिला यातून बाहेर काढायचे असेल, तर एखादा मोठा झटका देणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता दीपा कार्तिकच्या जीव घेण्याचं नाटक रचणार आहे. यामुळे तरी आयेशाला धक्का बसेल आणि ती पुन्हा पूर्ववत होतील, असे दीपाला वाटत आहे.
सतत इनामदार कुटुंबाला धक्का देणाऱ्या देशमुख बाई आणि त्यांच्या मुलीला म्हणजेच आयेशाला दीपा चांगलीच अद्दल घडवणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आयेशा देशमुख स्वतःचं सगळं सामान घेऊन इनामदारांच्या घरात राहायला गेली आहे. यावेळी दीपा तिच्याकडून सत्य वदवून घेण्यसाठी मोठा डाव खेळणार आहे. इनामदार कुटुंबाने मिळून ठरवलेल्या प्लॅननुसार कार्तिकी श्वेताचा विश्वास जिंकून तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवून घेतलं आहे. तर, दीपा, कार्तिक आणि सौंदर्या हे लोक आयेशाकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत. दोघींचे कटकारस्थान आता ते उघडकीस आणणार आहेत.
सगळे प्रयत्न करून देखील आयेशा खरं सांगत नाहीये हे कळल्यावर आता दीपा कार्तिकच्या मृत्यूचा डाव रचणार आहे. यासाठी ती इनामदारांच्य घरात मोठा तमाशा करणार आहे. दीपा आयेशाला घराबाहेर काढायला सांगणार आहे. मात्र, यावेळी कार्तिक आयेशाच्या बचावासाठी पुढे येणार आहे. आयेशा या घरातून कुठेही जाणार नाही, असे कार्तिक म्हणणार आहे. तर, मी तुला घटस्फोट देऊन आयेशाशी लग्न करणार, असे देखील तो बोलणार आहे.
अशावेळी दीपा राग आल्याचं नाटक करून कार्तिकला जीवे मारण्याची धमकी देणार आहे. जर, तू आयेशाशी लग्न केलंस तर, मी मंडपातच तुझा जीव घेईन, अशी धमकी दीपा कार्तिकला देणार आहे. दीपाची धमकी ऐकून आयेशा देखील घाबरणार आहे. मात्र, आता तरी ती खरं सत्य सांगेल का? हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या