मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranbir Kapoor: केकवर दारू ओतत रणबीर कपूर असं काय म्हणाला की नेटकरीही संतापले? Video Viral

Ranbir Kapoor: केकवर दारू ओतत रणबीर कपूर असं काय म्हणाला की नेटकरीही संतापले? Video Viral

Dec 27, 2023, 02:42 PM IST

  • Ranbir Kapoor Viral Video: एकीकडे रणबीरने चाहत्यांना सरप्राईज दिलं. तर, दुसरीकडे रणबीरने या पार्टीत असं काही केलं की, चाहते नाराज झाले आहेत.

Ranbir Kapoor Viral Video

Ranbir Kapoor Viral Video: एकीकडे रणबीरने चाहत्यांना सरप्राईज दिलं. तर, दुसरीकडे रणबीरने या पार्टीत असं काही केलं की, चाहते नाराज झाले आहेत.

  • Ranbir Kapoor Viral Video: एकीकडे रणबीरने चाहत्यांना सरप्राईज दिलं. तर, दुसरीकडे रणबीरने या पार्टीत असं काही केलं की, चाहते नाराज झाले आहेत.

Ranbir Kapoor Viral Video: बॉलिवूडमध्ये मोठा दबदबा असणारं कपूर कुटुंब प्रत्येक सण जोरदार पद्धतीने साजरा करतं. प्रत्येक सणाच्या निमित्ताने एकत्र जमून सगळे कपूर जल्लोष करतात. आता नुकताच नाताळच्या निमित्ताने कपूर कुटुंबाचा हा जल्लोष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नाताळाच्या सेलिब्रेशनसाठी रणबीर कपूर, आलिया भट्टपासून ते सगळेच कपूर आणि बॉलिवूडमधील काही जवळची मित्रमंडळी मिळून पार्टी करताना दिसली होती. या दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र, यातील एका व्हिडीओवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. हा व्हिडीओ रणबीर कपूरचा असून, त्याच्या एका कृतीमुळे सध्या अभिनेता चांगलाच ट्रोल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी ख्रिसमसचं निमित्त साधून आपल्या लेकीचा चेहरा देखील सगळ्यांना दाखवला. कपूर घराण्याच्या ख्रिसमस पार्टीत ते तिघे सहभागी झाले होते. एकीकडे रणबीरने चाहत्यांना सरप्राईज दिलं. तर, दुसरीकडे रणबीरने या पार्टीत असं काही केलं की, चाहते नाराज झाले आहेत. या जंगी ख्रिसमस पार्टीत रम केक देखील ठेवण्यात आला होता. या केकवर रम ओतून रणबीरने त्या केकला लायटरने फ्लेम केलं. यावेळी तो जोराने 'जय माता दी' असे बोलतो. रणबीरची हीच कृती त्याच्या चाहत्यांना आवडलेली नाही. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bigg Boss 17: विकी जैनने खरंच कानाखाली मारणार होता; अंकिता लोखंडेच्या प्रतिक्रियेमुळे झाला खुलासा!

नाताळच्या निमित्ताने कपूर कुटुंबात खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत लंच देखील ठेवण्यात आला होता. यावेळी सगळी कलाकार मंडळी जेवणाचा आस्वाद घेताना दिसली. सगळे जेवणाच्या टेबलवर बसलेले असताना जहाँ कपूर तिथे एक केक घेऊन येतो आणि त्यावर मद्य ओततो. यानंतर त्या केकवर रणबीर कपूर आग पेटवतो आणि जोरात 'जय माता दी' असे बोलतो. रणबीर कपूर हिंदू धर्माची खिल्ली उडवत असल्याचे काही नेटकरी म्हणत आहेत. 'दारू ओतून का जय माता दी म्हणावं?' असे नेटकरी म्हणत आहेत.

पुढील बातम्या