
नाताळच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये देखील सणाचं वातावरण आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील यंदा जोशात ख्रिसमस सेलिब्रेशन करत आहेत.
अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकतंच मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं आहे. याच घरात तिने यंदा ख्रिसमस सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने घरात सुंदर सजावट केली आहे.
अभिनेत्री हंसिका मोटवानी ही सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून, पतीसोबत स्वित्झर्लंडमध्येच नाताळ साजरा करत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी हिने देखील घरात सुंदर ख्रिसमस ट्री सजवला आहे. तर, अभिनेत्री स्टायलिश अंदाजात नाताळ साजरा करताना दिसली आहे.


