मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant Arrest: राखी सावंतची सुटका! प्रतिक्रिया देत म्हणाली...

Rakhi Sawant Arrest: राखी सावंतची सुटका! प्रतिक्रिया देत म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 20, 2023, 08:47 AM IST

    • Rakhi Sawant: राखी सावंतला मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे अंबोली पोलिसांनी अटक केली होती.
राखी सावंत (HT)

Rakhi Sawant: राखी सावंतला मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे अंबोली पोलिसांनी अटक केली होती.

    • Rakhi Sawant: राखी सावंतला मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे अंबोली पोलिसांनी अटक केली होती.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत १९ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिला अंबोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात आली. दिवसभर चौकशी झाल्यानंतर राखीची सुटका झाली. पोलीस स्टेशनबाहेर येताच राखीने माध्यमांशी संवाद साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी तिची बाजू मांडताना दिसत आहे. “जय महाराष्ट्र, जय भारत, मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे, तिची प्रकृती ठिक नाही. मला चक्कर येत आहे, माझा बीपी लो झालाय, मी दिवसभर जेवणही केलेलं नाही,” असे राखी म्हणाली.
वाचा: रियाज सोबतच्या 'त्या' व्हिडीओमुळे अमृता फडणवीस अडचणीत, काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी राखीने एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी राखीला अटक केली आहे. मॉडेलने तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत, नोव्हेंबर २०२२मध्ये राखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेकदा राखीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. राखी सावंतने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला होता. शेवटी काल राखीला अटक करण्यात आली होती.

विभाग

पुढील बातम्या