मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raj Kapoor: राज कपूर यांच्या चेंबूरमधील बंगल्याची विक्री; 'या' कंपनीनं केला खरेदी

Raj Kapoor: राज कपूर यांच्या चेंबूरमधील बंगल्याची विक्री; 'या' कंपनीनं केला खरेदी

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 18, 2023, 12:21 PM IST

  • Godrej Properties buys Raj Kapoor Bungalow : दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला शुक्रवारी विकला गेला आहे. एका मोठ्या कंपनीने तो खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Kapoor

Godrej Properties buys Raj Kapoor Bungalow : दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला शुक्रवारी विकला गेला आहे. एका मोठ्या कंपनीने तो खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Godrej Properties buys Raj Kapoor Bungalow : दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला शुक्रवारी विकला गेला आहे. एका मोठ्या कंपनीने तो खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारे अभिनेते म्हणजे राज कपूर. ते केवळ एक अभिनेते नव्हते तर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली तसेच दिग्दर्शनही केले. आता राज कूपर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला विकला गेला आहे. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने शुक्रवारी तो खरेदी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

गोदरेज कंपनीने नुकताच शेअर बाजारात माहिती दिली की राज कपूर यांचे घर वारसदारांकडून खरेदी केले आहे. हे घर किती रुपयांना विकले गेले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी २०१९मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने गोदरेज आरकेएस योजना विकसित करण्यासाठी कपूर कुटुंबीयांकडून चेंबूरमधील आर के स्टूडीओ खरेदी केला होता. त्यानंतर आता राज कपूर यांचे घर खरेदी केले आहे.
वाचा: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला पुरस्कार

गोदरेज कंपनीचे सीइओ गौरव पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'आम्ही या प्रतिष्ठित परियोजनेला आमच्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन आनंदी झालो आहोत आणि आम्हाला ही संधी देण्यासाठी कपूर कुटुंबीयांचे खूप आभार' असे गौरव पांडे म्हणाले.

विभाग

पुढील बातम्या