मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pravin Tarde: अभिनेते प्रविण तरडे यांचा ऐतिहासिक चित्रपट 'बलोच' या दिवशी होणार प्रदर्शित

Pravin Tarde: अभिनेते प्रविण तरडे यांचा ऐतिहासिक चित्रपट 'बलोच' या दिवशी होणार प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 30, 2023, 06:08 PM IST

    • Baloch: मराठ्यांची विजयगाथा 'बलोच' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
बलोच (HT)

Baloch: मराठ्यांची विजयगाथा 'बलोच' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

    • Baloch: मराठ्यांची विजयगाथा 'बलोच' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत असणारा 'बलोच' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

'बलोच' या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. 'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत.
वाचा: कोणी वकील तर कोणी इंजिनिअर; नोकरी सोडून 'हे' बनले टॉप स्टँडअप कॉमेडियन

आजवर देशासाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित 'बलोच' या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून सोबतच 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत.

विभाग

पुढील बातम्या