मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush Teaser : बहुचर्चित 'आदिपुरुष'चा टीझर प्रदर्शित, क्रिती सेनॉनच्या लूकवर चाहते फिदा

Adipurush Teaser : बहुचर्चित 'आदिपुरुष'चा टीझर प्रदर्शित, क्रिती सेनॉनच्या लूकवर चाहते फिदा

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 03, 2022, 08:41 AM IST

    • Prabhas: टीझर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आदिपुरुष (HT)

Prabhas: टीझर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Prabhas: टीझर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'बाहुबली' फेम लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (prabhas)चाहत्यांचा अत्यंत लाडका आहे. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रभास लवकरच 'आदिपुरुष' (adipurush) या चित्रपटात दिसणार आहे. प्रभास , सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांचा 'आदिपुरुष' पूर्वीपासूनच चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटासाठी चाहते प्रचंड उत्साहात आहेत. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'आदिपुरुष' चित्रपटाच्या १ मिनिटे ४६ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभास, सैफ आणि क्रितीची जबरदस्त एण्ट्री पाहायला मिळते. टीझरच्या सुरुवातीलाच प्रभास पाण्याच तपश्चर्या करत असल्याचे दिसते. त्यानंतर हातात धनुष्य घेऊन तो शत्रूंवर हल्ला करताना दिसतो. तर दुसरीकडे सैफ अली खान हिमालयात असल्याचे दिसते. त्याची रावणाप्रमाणे दहा तोंड असल्याचे दाखवण्यात आले आहे.
वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार विजयसोबत दिसणार मराठमोळा सिद्धार्थ जाधव, टीझर प्रदर्शित

टीझरमध्ये क्रितीची हलकी झलक पाहायला मिळते. पण त्या काही सेकंदामधील क्रितीच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच चित्रपटाला अभिनेता शरद केळकरने आवाज दिला आहे. एकंदरीत टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

'आदिपुरुष' चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच टीझरमध्ये काही मराठी कलाकार देखील असल्याचे दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी केली आहे.

विभाग

पुढील बातम्या