मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ऐश्वर्या बच्चन पुन्हा गर्भवती? चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा

ऐश्वर्या बच्चन पुन्हा गर्भवती? चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा

Sep 25, 2022, 11:20 AM IST

    • Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचे याआधीही काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर सोशल मीडियावर युजर्सनी ती गर्भवती असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा हीच चर्चा सुरू झाली आहे.
ऐश्वर्या राय पोनियन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे (फोटो - पीटीआय)

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचे याआधीही काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर सोशल मीडियावर युजर्सनी ती गर्भवती असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा हीच चर्चा सुरू झाली आहे.

    • Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचे याआधीही काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर सोशल मीडियावर युजर्सनी ती गर्भवती असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा हीच चर्चा सुरू झाली आहे.

Aishwarya Rai Bachchan बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच पोनियन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्या सध्या चित्रपटाच्या प्रमोशन आणि इतर कामांमध्ये व्यग्र आहे. नुकतंच एका ठिकाणी ती हेवी ओव्हरसाइज कपड्यांमध्ये दिसून आली. याआधीही ती एकदा ती हेवी सूटमध्ये दुपट्ट्याने आपलं पोट झाकताना दिसली होती. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर सोशल मीडियावर युजर्सनी ऐश्वर्या राय बच्चन गर्भवती असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा हीच चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्सनी कमेंट केलीय की ऐश्वर्या दुसऱ्यांदा गर्भवती आहे का? असंही विचारलं जातंय की ऐश्वर्या दुपट्टा आणि ओव्हरसाइज ड्रेसच्या माध्यमातून बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय का? ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं २००७ मध्ये लग्न झालं.

<p>ऐश्वर्या राय</p>

ऐश्वर्या आणि अभिषेक यांना लग्नानंतर चार वर्षांनी मुलगी झाली. तिचं नाव अराध्या असं ठेवण्यात आलं. आता अराध्या १० वर्षांची असून सोशल मीडियावर आता चर्चा आहे की ऐश्वर्या पुन्हा गर्भवती आहे. यावर बच्चन कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ऐश्वर्या सध्या पोनियन सेल्वन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मणि रत्नम यांचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्याचा अभिनय असणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे.

विभाग

पुढील बातम्या