मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ponniyin Selvan: ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेलवन'ची दुसऱ्याच दिवशी दमदार कमाई

Ponniyin Selvan: ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेलवन'ची दुसऱ्याच दिवशी दमदार कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 02, 2022, 04:47 PM IST

    • Ponniyin Selvan box Office collection : प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.
पोन्नियिन सेलवन (HT)

Ponniyin Selvan box Office collection : प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

    • Ponniyin Selvan box Office collection : प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी 'पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतात ४२ कोटी रुपये कमावले. तर जगभरात ८३ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. तमिळनाडूमध्ये 'पोन्नियिन सेलवन' हा तिसरा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली आहे. याआधी 'वलिमाई' आणि 'बीस्ट' या चित्रपटांनी कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

शनिवारी 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाने ३४.६० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे दिसले. रविवारी चित्रपट कमाईच्या बाबतीत १०० कोटी रुपयांचा पल्ला पार करेल असे म्हटले जात आहे.
वाचा: पॉर्न प्रकरणी राज कुद्रांचा गंभीर आरोप, म्हणाला, मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी...

केव तमिळनाडूमध्ये पहिल्याच दिवशी चित्रपटाने २५ कोटी रुपये कमावले. शनिवारी २३ कोटी रुपये. फक्त तमिळनाडूमधील 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ४७ ते ४९ कोटी रुपयांच्या पुढे असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्याच दिवशी ७५ कोटी रुपये कमावणारा हा चित्रपट हिट ठरणार असे म्हटले जात आहे. जगभरात 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाने १२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिल, कन्नड़ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाण्यांना एआर रहमानने संगीत दिले आहे.

विभाग

पुढील बातम्या