मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Main Atal Hoon Review: कसा आहे पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूं' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Main Atal Hoon Review: कसा आहे पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूं' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 19, 2024, 11:10 AM IST

    • Main Atal Hoon movie Review: 'मैं अटल हूं' या बहुचर्चित चित्रपटात अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठीने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेऊया...
Main Atal Hoon movie Review

Main Atal Hoon movie Review: 'मैं अटल हूं' या बहुचर्चित चित्रपटात अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठीने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेऊया...

    • Main Atal Hoon movie Review: 'मैं अटल हूं' या बहुचर्चित चित्रपटात अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठीने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेऊया...

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'मैं अटल हूं' नुकताच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठीने देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तेव्हा पासून या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आता चित्रपट कसा आहे चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

'मैं अटल हूं' या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एक व्यक्ती म्हणून, एक कवी म्हणून, एक मित्र म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचे इतरांशी असलेले संबंध दाखवण्यात आले आहेत. एकंदरीत वाजपेयी यांचा जीवनप्रवास या सिनेमातून उलगघडतो.
वाचा: पतीचे परक्या मुलीसोबत संबंध? ईशा देओलच्या घटस्फोटाचे कारण आले समोर

आजच्या पिढीला अटल यांच्या राजकीय कारगिर्दीविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी एक खजिना ठरु शकतो. पण ज्यांना त्यांच्याविषयी माहिती आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट काही विशेष वेगळा ठरणार नाही. चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा ही पाहण्यासारखी आहे. कारण अटल यांच्या जीवनातील वेगवेगळे पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या माध्यमातून अटल यांची कहाणी सरळ मार्गाने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. उगाच खेचून ताणून चित्रपटात काही सीन टाकण्यात आल्याचे कधीही भासत नाही. काही ठिकाणी कथा भावनिक मोड घेते कर काही ठिकाणी अधिक रंजक होताना दिसते. २ तास २० मिनिटे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

पंकज त्रिपाठी चित्रपटाचा जीव आहेत. त्यांचा अभिनय हा कमाल आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे अतिशय आव्हानात्मक असतानाही पंकज त्रिपाठीने ही जबाबादारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. मग अटल यांची कविता असो वा भाषण पंकज त्रिपाठी भूमिका जीवंत करताना दिसतो. तसेच पीयूष मिश्रा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वडिलांची भूमिका योग्य पद्धतीने साकारली आहे.

विभाग

पुढील बातम्या