मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  National Awards 2023: ‘पुष्पा’ने करून दाखवलं! राष्ट्रीय पुरस्कार मिळताच अल्लू अर्जुनच्या घरी जल्लोष

National Awards 2023: ‘पुष्पा’ने करून दाखवलं! राष्ट्रीय पुरस्कार मिळताच अल्लू अर्जुनच्या घरी जल्लोष

Aug 25, 2023, 08:14 AM IST

  • Allu Arjun National Awards 2023: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचे अभिनंदन करण्यासाठी लोक त्याच्या घरी पोहोचत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Allu Arjun National Awards 2023

Allu Arjun National Awards 2023: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचे अभिनंदन करण्यासाठी लोक त्याच्या घरी पोहोचत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • Allu Arjun National Awards 2023: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचे अभिनंदन करण्यासाठी लोक त्याच्या घरी पोहोचत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Allu Arjun National Awards 2023: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसाठी ‘पुष्पा’ हा चित्रपट अतिशय खास ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले होते. पण, त्यानंतर आता या चित्रपटाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला आहे, जो आतापर्यंत कोणत्याच साऊथ चित्रपटाने केला नव्हता. अनेक तेलुगू चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत एकाही तेलुगू अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता. आता अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारानंतर अभिनेत्याच्या घरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचे अभिनंदन करण्यासाठी लोक त्याच्या घरी पोहोचत असल्याचे पाहायला मिळाले आहे. या खासप्रसंगी लोक त्याला मिठी मारून अभिनंदन करत आहेत. अल्लू अर्जुनच्या घराबाहेर देखील अनेक चाहते जमा झाले आहेत. चाहतेच नव्हे, तर त्याचे जवळचे मित्र देखील या खास क्षणी त्याच्या घरी पोहोचले होते.

Rajiv Kapoor Birthday: ‘कपूर’ घराण्याचा लेक ज्याला मनोरंजन विश्वात प्रसिद्धी मिळालीच नाही! वाचा राजीव कपूरबद्दल…

यादरम्यान अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनाही आपल्या मुलाचा अभिमान वाटला आहे. अल्लू अरविंद यांनीही या खास प्रसंगी आपल्या मुलाला मिठी मारून आनंद व्यक्त केला. ‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमारही यावेळी अल्लू अर्जुनच्या घरी गेले होते. याशिवाय इतर लोकही हळूहळू अल्लू अर्जुनला भेटायला येत आहेत आणि त्याचे अभिनंदन करत आहेत. अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर या पुरस्काराचा आनंद पाहायला मिळाला आहे.

‘पुष्पा दा राईज’ या चित्रपटाने जगभरात तब्बल ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती. हिंदी भाषेतही हा चित्रपट खूप पसंत केला गेला होता. या चित्रपटाचे यश पाहून त्याच्या दुसऱ्या भागावरही सध्या प्रचंड मेहनत घेतली जात आहे आणि या चित्रपटाबाबत सातत्याने अपडेट्स समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी ४५ कोटी रुपये मानधन घेतले होते. आता तो चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी ८५ कोटी रुपये घेणार आहे.

विभाग

पुढील बातम्या