
Allu Arjun’s Daughter film Debut: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या दमदार अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. यातही आता त्याची चिमुकली लेक देखील मनोरंजन विश्वात पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अल्लू अर्जुनची लेक अल्लू अर्हा आता मनोरंजन विश्वात पदार्पण करून धमाका करणार आहे. साऊथ मनोरंजन विश्वाचा दिग्गज अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत अल्लू अर्हा स्क्रीन शेअर करणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ चित्रपटात अल्लू अर्हा झळकणार आहे.
'देवरा'चे शूटिंग सुरू झाल्यापासून ज्युनियर एनटीआरचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. 'देवरा' हा ज्युनियर एनटीआरच्या करिअरमधील ३०वा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दिग्दर्शक कोरटाला शिवासोबत काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्हा या चित्रपटात झळकणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'शाकुंतलम' नंतर अल्लू अर्हाने ज्युनियर एनटीआरचा बहुप्रतिक्षित 'देवरा' चित्रपट मिळवला आहे. अल्लू अर्हा या चित्रपटात जान्हवी कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप तिच्या एन्ट्रीवर निर्मात्यांनी किंवा तिच्या पालकांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता चाहते 'देवरा'च्या पुढील अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'देवरा'मध्ये जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटाद्वारे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहे. ज्युनियर एनटीआरसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. याचे दिग्दर्शन कोरटाला शिवा करत आहेत. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
मात्र, ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' या चित्रपटासाठी चाहत्यांना आणखी १ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोरटाला शिवा दिग्दर्शित ‘देवरा’ संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या आधी ज्युनियर एनटीआर आणि कोर्टाला शिवा यांनी 'जनता गॅरेज' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
संबंधित बातम्या
