मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  महिलेच्या तक्रारीनंतर अभिनेता करणवीरसह ६ जणांवर गुन्हा दाखल

महिलेच्या तक्रारीनंतर अभिनेता करणवीरसह ६ जणांवर गुन्हा दाखल

Jun 15, 2022, 08:13 AM IST

    • महिलेची बोहराशी २०१९ मध्ये मैत्री झाली होती. तेव्हा करणवीर बोहराचा 'हमे तुमसे प्यार कितना' हा चित्रपट आला होता.
करणवीर बोहरा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

महिलेची बोहराशी २०१९ मध्ये मैत्री झाली होती. तेव्हा करणवीर बोहराचा 'हमे तुमसे प्यार कितना' हा चित्रपट आला होता.

    • महिलेची बोहराशी २०१९ मध्ये मैत्री झाली होती. तेव्हा करणवीर बोहराचा 'हमे तुमसे प्यार कितना' हा चित्रपट आला होता.

अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) याच्यासह सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. महिलेची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. करणवीर बोहराने एका महिलेकडून १ कोटी ९९ लाख रुपये घेऊन ते परत न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओशिवरा इथल्या विंडरमेअरमध्ये राहणाऱ्या आणि गारमेंटचा व्यवसाय करणाऱ्या ४० वर्षीय महिलेनं तक्रार केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महिलेची बोहराशी २०१९ मध्ये मैत्री झाली होती. तेव्हा करणवीर बोहराचा 'हमे तुमसे प्यार कितना' हा चित्रपट आला होता. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित कऱण्यासाठी करणवीरने महिलेकडून ३५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर आरटीजीएसद्वारे १ कोटी ६६ लाख रुपये घेतल्याचा दावा महिलेनं केला आहे.

करणवीरने महिलेकडून पैसे घेताना अडीच टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवलं होतं. तसंच त्याच्या फ्लॅटची झेरॉक्स कागदपत्रे तारण ठेवली असा आरोप महिलेनं केला आहे. करणवीरने जवळपास दोन कोटी रुपयांपैकी १ कोटी रुपये परत दिले पण उरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करत होता. पैशांबाबत पत्नी तजिंदर सिंधू, आई मधुलता, महेंद्र कुमार बोहरा यांच्याकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. तसंच शिवीगाळ करून धमक्याही दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

महिलेनं पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. करणवीर बोहराने किस्मत कनेक्शन, मुंबई १२५ KM मध्ये काम केलं आहे. याशिवाय कसोटी झिंदगी की, नागिन २, शरारत, सौभाग्यवती भवं, कबुल है यांसारख्या मालिकांमधूनही तो झळकला आहे. तर नच बलिये सिजन ४, झलक दिखला जा सीजन ६, खतरो के खिलाडी सीजन ५ आणि बिग बाॅस सीजन १२ मध्येही स्पर्धक म्हणून दिसला होता.

पुढील बातम्या