मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रेक्षकांना सरप्राइज द्यायला गेलेल्या नुसरत भरुचाला मोठा धक्का, Video Viral

प्रेक्षकांना सरप्राइज द्यायला गेलेल्या नुसरत भरुचाला मोठा धक्का, Video Viral

Jun 14, 2022, 06:17 PM IST

  • आपल्या चित्रपटाच्या प्रेक्षकांना पाहायला नुसरत भरुचा थिएटरमध्ये पोहोचली खरी. मात्र तिथे गेल्यावर असं काय झालं की नुसरत भरुचा झाली हैराण.

नुसरत भरुचा (हिंदुस्तान टाइम्स)

आपल्या चित्रपटाच्या प्रेक्षकांना पाहायला नुसरत भरुचा थिएटरमध्ये पोहोचली खरी. मात्र तिथे गेल्यावर असं काय झालं की नुसरत भरुचा झाली हैराण.

  • आपल्या चित्रपटाच्या प्रेक्षकांना पाहायला नुसरत भरुचा थिएटरमध्ये पोहोचली खरी. मात्र तिथे गेल्यावर असं काय झालं की नुसरत भरुचा झाली हैराण.

बॉलीवुड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) सध्या आपला चित्रपट 'जनहित में जारी' (Janhit Mein Jaari) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुसरत एकीकडे पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने वाहवा घेत आहे. मात्र चित्रपट म्हणावा तसा दर्शक खेचण्यात अपयशी ठरत आहे.फिल्मचं कलेक्शन हळूहळू वाढतंय. याचवेळेस नुसरतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्ह्यरल होत आहे. व्हिडिओ मध्ये पाहायाला मिळतं की नुसरत भरुचा जनहित में जारी च्या प्रेक्षकांना सरप्राइज द्यायला थिएटरमध्ये पोहोचते मात्र असं काही होतं की ते पाहून नुसरत हैराण होते.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

कसा आहे नुसरत भरूचाचा व्हायरल व्हिडिओ

नुसरत भरुचाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला फिल्मी न्यूजतर्फे सोशल मिडियावर शेअर केलं गेलंय. व्हिडिओत पाहायला मिळतं की नुसरत भरुचा गेईटी गॅलेक्सीमध्ये पोहोचते तेव्हा तिथे जनहित में जारी चित्रपटाचा खेळ चाललेला असतो. नुसरत थिएटरच्या बाहेर प्रेक्षकांना सरप्राइज द्यायला येते खरी मात्र थिएटरमध्ये प्रेक्षकांची कमी असलेली संख्या पाहून ती हैराण होते. मात्र त्यानंतरही नुसरत हसतखेळत सर्व प्रेक्षकांना भेटते आणि प्रेक्षकही सेल्फी काढण्यात आणि मजा करण्यात दंग होतात.

काय आहे जनहित में जारी चं IMDb रेटींग

नुसरत भरूचा स्टारर फिल्म जनहित में जारी ला ८.१ IMDb रेटींग मिळालं आहे. हे रेटींग ३.६ हजार वोट्सच्या आधारावर बनवलं गेलं आहे. या चित्रपटात नुसरत एक सेल्स गर्लची भूमिका साकारत आहे, जी कॉन्डम सेल करत असते. या फिल्मला दर्शक पसंती मिळत आहे आणि फिल्म कमाई ठीक ठाक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाचं आतापर्यंतचं कलेक्शन २.५० कोटी रुपये इतकं झालं आहे.

कसं आहे फिल्मचं कलेक्शन

दूसऱ्या दिवशी फिल्मच्या कलेक्शनमध्ये ९०.७० टक्के आणि तिसऱ्या दिवशी १४.६३ टक्के ग्रोथ पाहायला मिळाली आहे. चौथ्या दिवशी फिल्मच्या कलेक्शनमध्ये ६७.०२ टक्कयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

पहिला दिवस : ०.४३ कोटी रुपये

दूसरा दिवस : ०.८२ कोटी रुपये

तीसरा दिवस : ०.९४ कोटी रुपये

चौथा दिवस : ०.३१ कोटी रुपये

विभाग

पुढील बातम्या