मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये लता मंगेशकरांच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये लता मंगेशकरांच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

Mar 14, 2023, 01:05 PM IST

  • Maharashtra Shahir Marathi Movie Update: शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुवर्ण इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.

Maharashtra Shahir

Maharashtra Shahir Marathi Movie Update: शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुवर्ण इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.

  • Maharashtra Shahir Marathi Movie Update: शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुवर्ण इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.

Maharashtra Shahir Latest Update: 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटात गानसम्राद्नी भारतरत्न लता मंगेशकर यांची भूमिका आघाडीची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन आता अंतिम टप्प्यावर सुरू आहे. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. साने गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण ही त्यांपैकीच काही नावे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. चित्रपटात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचीही व्यक्तिरेखा चित्रपटात असल्याचे कळते आहे. ही व्यक्तिरेखा आघाडीची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सकारात असल्याचे म्हटले जाता आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप याबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आघाडीच्या भूमिका केलेल्या आहेत. ‘हमने जिना सिख लिया’, ‘मोकळा श्वास’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘फत्तेशिकस्त’ असे कित्येक चित्रपट तिने गेल्या १५ वर्षांमध्ये केले आहेत. त्यशिवाय ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’, ‘सा रे ग म प’ अशा मालिका आणि टीव्ही शोसुद्धा तिने केले आहेत. ‘मन फकीरा’, ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटांचे दिग्दर्शन तिने केले आहे. एक गुणवान अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून तिची ओळख आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’मधील तिच्या लता मंगेशकर यांच्या व्यक्तिरेखेची त्यामुळेच उत्सुकता रसिकांना लागून राहिली आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’शी अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. नातवाने आजोबांवरील म्हणजे केदार शिंदेने त्याचे आजोबा शाहीर साबळे यांच्यावरील चित्रपट दिग्दर्शित करण्याचा चित्रपटसृष्टीतील एक दुर्मिळ योग यात जुळून आला. या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे साकार करत आहे.

विभाग

पुढील बातम्या