मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mission Majnu Twitter Review: सिद्धार्थ - रश्मिकाचा 'मिशन मजनू' कसा आहे? जाणून घ्या

Mission Majnu Twitter Review: सिद्धार्थ - रश्मिकाचा 'मिशन मजनू' कसा आहे? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 20, 2023, 03:48 PM IST

    • Mission Majnu: नुकताच बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा मिशन मजनू हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...
मिशन मजनू (HT)

Mission Majnu: नुकताच बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा मिशन मजनू हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...

    • Mission Majnu: नुकताच बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा मिशन मजनू हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणारा मिशन मजनू हा चित्रपट आज २० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कसा आहे हे जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर 'मिशन मजनू' या चित्रपटाचा रिव्ह्यू सांगितला आहे. एका यूजरने 'मास्टरपिस. सिद्धार्थ आणि त्याच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असती. चित्रपटाला ४.५ स्टार' या आशयाचे ट्वीट केले आहे.
वाचा: सिद्धार्थ मल्होत्रा ते रश्मिका मंदाना; मिशन मजनूसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन?

दुसऱ्या एका यूजरने 'उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय. रॉ मजनूची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जो त्याच्या देशाला आणि प्रेमालाही वाचवतो. मिशन मजनू या चित्रपटाने २०२३ची चांगली सुरुवात केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता' या आशयाचे ट्वीट केले आहे.

मिशन मजनू या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा , रश्मिका मंदाना , शारिब हाशमी , परमीत सेठी , शिशिर शर्मा और कुमुद मिश्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू बागचीने केले आहे. आज २० जानेवारी रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आह.

विभाग

पुढील बातम्या