मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Manjrekar: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते महेश मांजरेकर यांना करिअर

Mahesh Manjrekar: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते महेश मांजरेकर यांना करिअर

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 16, 2023, 08:00 AM IST

    • Mahesh Manjrekar Birthday: आज १६ ऑगस्ट रोजी महेश मांजरेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…
Mahesh Manjrekar (HT)

Mahesh Manjrekar Birthday: आज १६ ऑगस्ट रोजी महेश मांजरेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

    • Mahesh Manjrekar Birthday: आज १६ ऑगस्ट रोजी महेश मांजरेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातात. त्यांनी अभिनय आणि उत्तम दिगदर्शनाच्या जोरावर मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का महेश मांजरेकर यांना अभिनेता व्हायचे नव्हते. त्यांना एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे होते. आज १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

संजय दत्तच्या ‘वास्तव’ या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. दिग्दर्शन आणि लेखनासोबतच महेश मांजरेकर यांना अभिनेता म्हणून चाहत्यांनी मोठी पसंती दिली. खासकरून सलमान खानच्या ‘वांटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ अशा अनेक सिनेमांमधून महेश मांजरेकर यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचो मनोरंजन केले.
वाचा: १७ वर्षात अदनान सामीने केला चार वेळा निकाह, जाणून घ्या खासगी आयुष्याविषयी

एक उत्तम अभिनेता म्हणून महेश मांजरेकर हे ओळखले जातात. पण त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायचे नव्हते. त्यांने केवळ दिग्दर्शनाचा योग्य अभ्यास करुन त्यात करिअर करायचे होते. मात्र, स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडू लागला. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. वास्तव या चित्रपटात काम करत त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला खरी सुरुवात केली.

२००२ साली महेश मांजरेकर यांचा 'काटे' हा चित्रपट हिट ठरला आणि त्यांचे करिअर यशाच्या शिखराव पोहोचले. ऑस्कर पुरस्कार प्राप्त ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमातही महेश मांजरेकर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

विभाग

पुढील बातम्या