बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार म्हणून ओळखला जाणारा अदनान सामी हा कायमच चर्चेत असतो. आज १५ ऑगस्ट रोजी अदनानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी... अदनाने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याची 'तेरा चेहरा' आणि 'लिफ्ट करा दे' ही गाणी विशेष गाजली. करिअरसोबतच अदनान सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण तो कधीही खचून गेला नाही. त्याने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला.
अदनानने १९९३ मध्ये जेबा बख्तियारशी लग्न केले. अदनानला जेबापासून एक मुलगा आहे ज्याचे नाव त्याने अजान सामी खान ठेवले आहे. त्याने लग्नाच्या ३ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सामी पुन्हा सिंगल झाला पण २००१ मध्ये दुबईच्या अरब सबाह गलदारीसोबत त्याचे नाव जोडले गेले. अदनान आणि सबा या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अदनानप्रमाणेच सबालाही पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता. परंतु, हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दीड वर्षातच हे लग्न देखील तुटले. दोघांचा घटस्फोट झाला आणि अदनान सामी पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रवासात एकटा पडला.
वाचा: कधी काळी पोटासाठी जॉनी लिवरने विकले होते पेने, आज आहे कॉमेडीचा बादशाह
अदनानच्या वैयक्तिक आयुष्यात पुन्हा एक वळण आले जेव्हा २००८ मध्ये त्याने पुन्हा एकदा सबासोबत लग्न केले, जिच्यापासून त्याने पहिल्यांदा घटस्फोट घेतला होता. सबा मुंबईत आली, दोघे एकत्र राहू लागले, त्यांनी पुन्हा लग्न केले. पण वर्षभरानंतर दोघांनी पुन्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सबाने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि दोघे वेगळे झाले. २०१० मध्ये अदनान सामीने रोया सामी खानशी लग्न केले. रोया एका निवृत्त मुत्सद्दी आणि लष्करी जनरलची मुलगी आहे. रोयासोबत त्याची पहिली भेट २०१० मध्ये झाली आणि काही काळानंतर अदनानने तिला प्रपोज केले. या लग्नापासून त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी मदिना सामी खान ठेवले.