मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 14: स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल उत्तर?

KBC 14: स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल उत्तर?

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 17, 2022, 01:06 PM IST

    • स्पर्धकाला ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते. त्यामुळे त्याने खेळ सोडला. या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल का?
केबीसी १४ (HT)

स्पर्धकाला ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते. त्यामुळे त्याने खेळ सोडला. या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल का?

    • स्पर्धकाला ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते. त्यामुळे त्याने खेळ सोडला. या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल का?

Kaun Banega Crorepati 14 : सध्या छोट्या पडद्यावरील महितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा शो ‘कौन बनेगा करोडपती’ चर्चेत आहे. सध्या या शोचे १४वे पर्व सुरु आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शो हॉट सीटवर बसणारा प्रत्येक स्पर्धक बिग बींशी गप्पा मारताना दिसतो. त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगत असतो. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला खेळ सोडला आहे. या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता का?

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये कौन बनेगा करोडपती १४च्या हॉट सीटवर प्रख्यात शेट्टी बसले होते. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला. या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल का?
वाचा: ‘सैराट’मधील प्रिन्सला कोणत्याही क्षण अटक होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

काय होता ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न?

1994 मध्ये जपानी पाणबुडी RQ-110 च्या बुडण्यासाठी कोणती रॉयल इंडियन नेव्ही युद्धनौका संयुक्तपणे जबाबदार होती? हा प्रश्न ५० लाख रुपायांसाठी विचारला होता. या प्रश्नासाठी A. HMIS Jumna, B. HMIS Ratnagiri, C. HMIs Parvati आणि D. HMIS Lilavati हे पर्याय देण्यात आले होते. प्रख्यातने पर्याय B हे उत्तर देण्याचे ठरवले होते. पण नक्की माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. पण प्रख्यातने खेळ सोडून योग्य निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर A. HMIS Jumna असे आहे.

विभाग

पुढील बातम्या