मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunil Shetty: सुनील शेट्टीमुळे घाबरली होती करिश्मा कपूर, पोलिसांना बोलावण्याची आली होती वेळ

Sunil Shetty: सुनील शेट्टीमुळे घाबरली होती करिश्मा कपूर, पोलिसांना बोलावण्याची आली होती वेळ

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 29, 2023, 06:35 PM IST

    • Karishma Kapoor get Scared: अभिनेता सुनील शेट्टीमुळे अभिनेत्री करिश्मा कपूर ही खूप घाबरली होती. ती अक्षरश: पोलिसांना फोन करुन चित्रपटाच्या सेटवर बोलावणार होती. जाणून घ्या नेमके काय झाले होते.
Karishma Kapoor get Scared

Karishma Kapoor get Scared: अभिनेता सुनील शेट्टीमुळे अभिनेत्री करिश्मा कपूर ही खूप घाबरली होती. ती अक्षरश: पोलिसांना फोन करुन चित्रपटाच्या सेटवर बोलावणार होती. जाणून घ्या नेमके काय झाले होते.

    • Karishma Kapoor get Scared: अभिनेता सुनील शेट्टीमुळे अभिनेत्री करिश्मा कपूर ही खूप घाबरली होती. ती अक्षरश: पोलिसांना फोन करुन चित्रपटाच्या सेटवर बोलावणार होती. जाणून घ्या नेमके काय झाले होते.

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी जोडी म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता सुनील शेट्टी. त्यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत होती. पण तुम्हाला माहिती आहे का एक वेळ अशी होती जेव्हा करिश्मा सुनील शेट्टीमुळे घाबरली होती. स्वत: करिश्माने याबाबत एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

करिश्मा म्हणाली होती की, 'एकदा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. मी पाहिले की दोन माणसे चाकू घेऊन सेटवर भांडत होते. त्यांचे भांडण इतके जोरात सुरु होते की मी घाबरले. मला खूप भीती वाटत होती आणि मी पोलिसांना फोन करणार होते. माझ्या डोळ्यातून पाणी येणार होते तेवढ्यात सुनीलने पाहिले की मी खूप घाबरले आहे. तो आला आणि म्हणाला आम्ही हा प्रँक करत आहोत.'
वाचा: शाहरुखच्या 'कल हो ना हो'ला पूर्ण झाली २० वर्ष! करण जोहर पोस्ट लिहीत म्हणाला...

पुढे करिश्मा म्हणाली, 'आम्ही चैन्नईमध्ये चित्रीकरण करत होतो. मी एका धोतर नेसलेल्या व्यक्तीला चालत येताना पाहिले. मला असे वाटले की तो साऊथमधील कोणी तरी मोठा अभिनेता आहे ज्याला मी ओळखत नाही. सुनील तेवढ्यात तिथे येतो आणि त्याच्यासोबत फोटो काढून गप्पा मारतो. जवळपास २० मिनिटे त्यांच्यामध्ये संभाषण सुरु असते. दुसऱ्यादिवशी तिच व्यक्ती शुटच्या आधी माझा मेकअप करण्यासाठी आली होती. मी त्याला पाहून हैराण झाले. मी पळत सुनीलकडे गेले आणि त्याला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की प्रँक होता. त्यावर आम्ही खूप हसलो.'

सुनील शेट्टी आणि करिश्माने गोपी किशन, सपूत, बाज आणि कृष्णा अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. दोघांच्याही आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर सुनील शेट्टीचा 'हेरा फेरी ३' लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर करिश्मा अक्षय कुमारच्या मर्डर मुबारक या चित्रपटात दिसणार आहे.

पुढील बातम्या