मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Koffee With Karan : कॉफी विथ करणमध्ये तापसी पन्नूला का बोलावलं नाही? करणने दिलं स्पष्टीकरण

Koffee With Karan : कॉफी विथ करणमध्ये तापसी पन्नूला का बोलावलं नाही? करणने दिलं स्पष्टीकरण

Sep 29, 2022, 12:12 PM IST

    • Koffee With Karan : तापसीशिवाय जान्हवी कपूरबद्दलही प्रश्न विचारला गेला. सारा अली खान हिच्याऐवजी जान्हवीला करण जोहर जास्त सपोर्ट करत होता असा आरोप करण्यात आला.
अभिनेत्री तापसी पन्नू (फोटो - राहुल सिंग)

Koffee With Karan : तापसीशिवाय जान्हवी कपूरबद्दलही प्रश्न विचारला गेला. सारा अली खान हिच्याऐवजी जान्हवीला करण जोहर जास्त सपोर्ट करत होता असा आरोप करण्यात आला.

    • Koffee With Karan : तापसीशिवाय जान्हवी कपूरबद्दलही प्रश्न विचारला गेला. सारा अली खान हिच्याऐवजी जान्हवीला करण जोहर जास्त सपोर्ट करत होता असा आरोप करण्यात आला.

Koffee With Karan : करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोचा यावेळचा सिझन चांगलाच चर्चेत आहे. आता शेवटच्या टप्प्यात हा सिझन आहे. यात सोशल मीडिया स्टार्स ज्युरी होऊन आले होते. त्यांनी करण जोहरला पूर्ण सिझनबाबत काही प्रश्न केले. यामध्ये तन्मय भट, दानिश सेट, निहारीका एनएम यांचा समावेश होता. चौघांनी कऱण जोहरसोबत पूर्ण सिझनबाबत चर्चा केली. यावेळी काही प्रश्नही त्यांनी करणला विचारले. तेव्हा सिझनमध्ये तापसी पन्नूला का बोलावलं नाही असं विचारण्यात आलं.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

करण जोहरने या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, हा सिझन फक्त १२ भागांचा होता. तुम्हाला एक कॉम्बिनेशन हवं असतं. तापसीला हेच सांगेन की तुला माहितीय की मी तुला कधी रिक्वेस्ट करू शकतो आणि शो मध्ये केव्हा बोलावेन. आम्ही एका वेगळ्या कॉम्बिनेशनवर काम करत आहे आणि जर तिने नकार दिला तर मला वाईट वाटेल.

तापसीशिवाय जान्हवी कपूरबद्दलही प्रश्न विचारला गेला. सारा अली खान हिच्याऐवजी जान्हवीला करण जोहर जास्त सपोर्ट करत होता असा आरोप करण्यात आला. यावर करणने म्हटलं की, तुम्हाला माहिती आहे का जान्हवीला कॉफी हॅम्पर मोमेंट जिंकण्याची संधी होती ती दुर्दैवाने वाया गेली. शोच्या क्रू मेंबर्सनी केलेल्या चुकीमुळे? यावेळी करण जोहरने एपिसोडमधील एक व्हिडीओसुद्धा दाखवला.

कॉफी कॉन्ट्रोव्हर्सी झाली तरी काही खुलासेही यावेळी झाले जे चर्चेत राहीले. यंदाच्या हंगामात सेलिब्रिटींच्या पर्सनल लाइफ आणि खासगी आय़ुष्यावर चर्चा झाली. यावर सेलिब्रिटींनी खुल्या मनाने चर्चा केली.

पुढील बातम्या