मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra Box Office: तिकीट १०० रुपये होताच ‘ब्रह्मास्त्र’नं जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Brahmastra Box Office: तिकीट १०० रुपये होताच ‘ब्रह्मास्त्र’नं जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Sep 29, 2022, 06:08 PM IST

    • Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरूच असून प्रदर्शनानंतरच्या २०व्या दिवशीही चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.
Brahmastra

Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरूच असून प्रदर्शनानंतरच्या २०व्या दिवशीही चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.

    • Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरूच असून प्रदर्शनानंतरच्या २०व्या दिवशीही चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.

Brahmastra Box Office Collection Day 20: सोशल मीडियावरील बहिष्काराच्या आवाहनामुळं सुरुवातीला चर्चेत असलेल्या रणबीर- आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची तिकीटबारीवर घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शित होऊन २० दिवस झाले तरी प्रेक्षकांचा ‘ब्रह्मास्त्र’ला प्रतिसाद मिळत आहे. तिकिटाचे दर १०० रुपये झाल्याचा मोठा फायदा चित्रपटाला झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात रणबीर-आलिया या दोघांशिवाय अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मौनी रॉय व नागार्जुन सारखे दिग्गज कलाकार आहेत. मात्र, चित्रपट खऱ्या अर्थानं गाजला तो त्यावरील बहिष्कारामुळं. हा चित्रपट कमाई करेल का, अशी शंका सुरुवातीला होती. मात्र, बहिष्काराचं अस्त्र ‘ब्रह्मास्त्र’पुढं फेल ठरलं. या चित्रपटानं पहिल्या दिवशी तब्बल ३६ कोटींची कमाई केली. तर, प्रदर्शनानंतरच्या पहिल्या वीकेंडनं चित्रपटाला चांगलाच हात दिला. वीकेंडच्या दिवसात चित्रपटानं १२०.७५ कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळं पहिल्या आठवड्यातील कमाई १६८.७५ कोटी रुपयांवर गेली होती. दुसऱ्या आठवड्यात २२२.३० कोटी रुपये कमावले. चित्रपटाचं एकूण कलेक्शन २५७ कोटी रुपयांच्या जवळपास झालं आहे.

चित्रपटाच्या कमाईची प्रत्येक दिवसाची आकडेवारी अशी

पहिला दिवस: ३६ कोटी 

दुसरा दिवस: ४१.५० कोटी 

तिसरा दिवस: ४३.२५ कोटी 

चौथा दिवस: १६ कोटी 

पाचवा दिवस : रु १२.५० कोटी

सहावा दिवस: रु १०.५० कोटी

सातवा दिवस: ९ कोटी रु

आठवा दिवस: ९.२५ कोटी

नववा दिवस : १४.५० कोटी रु

दहावा दिवस : रु १५.५० कोटी

११ वा दिवस: ४.८० कोटी रुपये

१२ वा दिवस: ३.८५ कोटी रुपये

१३ वा दिवस: ३.२० कोटी

१४ वा दिवस: रु २.७० कोटी

१५ वा दिवस: रु ८.८० कोटी

१६ वा दिवस: ५.८५ कोटी

१७ वा दिवस: ६.३० कोटी रुपये

१८ वा दिवस: १.८५ कोटी

१९ वा दिवस : १.५५ कोटी रुपये

२० वा दिवस: रु १.७५ (प्रारंभिक ट्रेंड)

ब्रह्मास्त्र तीन भागांत येणार

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट तीन भागांत येणार आहे. कमाईची आकडेवारी पाहता यातील पहिला भाग शिवा हिट झाला आहे. त्यामुळं चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'ब्रह्मास्त्र'चा दुसरा भाग देव आणि अमृता यांच्याभोवती फिरताना दिसणार आहे. अधिकृत घोषणा झाली नसली तरी नव्या भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार असल्याचं बोललं जातं. ब्रह्मास्त्रला भारतात ५,०१९ आणि परदेशात सुमारे ३,८९४ स्क्रीन्स मिळाल्या आहेत. याचा अर्थ, हा चित्रपट जवळपास ८,९१३ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. 

पुढील बातम्या