मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhuban Badyakar: ‘कच्चा बादाम’ फेम भुबनचे दिवस फिरले! रडत व्हिडीओ केला शेअर

Bhuban Badyakar: ‘कच्चा बादाम’ फेम भुबनचे दिवस फिरले! रडत व्हिडीओ केला शेअर

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 02, 2023, 10:58 AM IST

    • Bhuban Badyakar: कच्चा बादाम फेम भुबन बाड्याकरची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. त्याला शो देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे.
भुबन (HT)

Bhuban Badyakar: कच्चा बादाम फेम भुबन बाड्याकरची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. त्याला शो देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे.

    • Bhuban Badyakar: कच्चा बादाम फेम भुबन बाड्याकरची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. त्याला शो देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे की काहींचे आयुष्य रातोरात बदलले आहे. या मध्ये 'कच्चा बादाम' गाणे गाणारा भुवन बड्याकर देखील आहे. त्याचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तो रातोरात स्टार झाला. पण आता भूवनवर बिकट परिस्थिती ओठावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

भुबनने त्याची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. भुबन बड्याकार यांच्या गाण्याचा दुसऱ्याने कॉपीराइट घेतला आहे. त्यामुळे त्यांना ते गाणं गाता येत नाही. सोशल मीडियावर ते गाणं पोस्ट केल्यावरत्यांना कॉपीराइट पाठवला जात आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढली आहेत. या सगळ्यामुळे उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे.
वाचा: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?

भुबनने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने एका गोपाल नावाच्या व्यक्तीने फसवणूक केल्याचे सांगितले आहे. '३ लाख रुपये देऊन त्याने गाणे त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले. आता जेव्हा मी हे गाणे गातो आणि अपलोड करतो तेव्हा कॉपीराईटचा इश्यू येत आहे. त्या व्यक्तीने पैसे देताना काही कागदपत्रांवर माझ्या सह्याही घेतल्या होत्या. मी अशिक्षित आहे. मला हे सर्व समजत नाही आणि यामुळे माझा गैरफायदा घेतला गेला आहे' असे भुबन म्हणाला.

पुढे तो म्हणाला, 'सध्या मला काम मिळत नाही. आता मी शोमध्ये ते गाणेही गाऊ शकत नाही. छोटी-मोठी कामे करून महिन्याला हजार रुपये कमावत आहे. त्यातूनच उतरनिर्वाह करतोय. हे अजून किती दिवस चालेल माहीत नाही.'

विभाग

पुढील बातम्या