मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Billi Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?

Billi Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 01, 2023 01:37 PM IST

Billi Billi Teaser Out: ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील दुसरे गाणे ‘बिल्ली बिल्ली’ लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, गाण्याच्या रिलीजपूर्वी सलमानने या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.

Billi Billi Teaser Out
Billi Billi Teaser Out

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song Billi Billi Teaser Out Now: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या चित्रपटाच्या टीझरने भाईजानच्या चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. आता ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील दुसरे गाणे ‘बिल्ली बिल्ली’ लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, गाण्याच्या रिलीजपूर्वी सलमानने या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.

सलमान खान आणि शहनाज गिल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘बिल्ली बिल्ली’ या गाण्याचे प्रमोशन करत आहेत. यासाठी आधी सलमान खानने मांजरीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या सोबतच गाण्याच्या रिलीजच्या तारखेबद्दल देखील सांगितले आहे. यानंतर शहनाज गिलने ‘कॅट’ लूकमध्ये तिचा एक फोटो शेअर करून अनोख्या पद्धतीने गाण्याचे प्रमोशन केले. आता ‘किसी का भाई किसी की जान’च्या ‘बिल्ली बिल्ली’ या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ या गाण्याचा टीझर रिलीजनंतर अवघ्या एका दिवसानंतरच संपूर्ण गाणे रिलीज होणार आहे. सलमान खान उद्या म्हणजेच २ मार्च रोजी ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणे रिलीज करणार आहे. ‘किसी की भाई किसी की जान’ यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. भाईजानचा हा चित्रपट यावर्षी २१ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. ‘किसी की भाई किसी की जान’चे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. त्याचबरोबर साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point