मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  John Abraham: 'पठाण'च्या यशानंतर जॉन अब्राहमने स्वत:ला दिले खास गिफ्ट, खरेदी केली सुपर बाईक

John Abraham: 'पठाण'च्या यशानंतर जॉन अब्राहमने स्वत:ला दिले खास गिफ्ट, खरेदी केली सुपर बाईक

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 13, 2023, 02:32 PM IST

    • John Abraham New Superbike: जॉनचा बाईकसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने खरेदी केलेली नवी सुपरबाईक दिसत आहे.
John Abraham

John Abraham New Superbike: जॉनचा बाईकसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने खरेदी केलेली नवी सुपरबाईक दिसत आहे.

    • John Abraham New Superbike: जॉनचा बाईकसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने खरेदी केलेली नवी सुपरबाईक दिसत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'पठाण' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २० दिवस उलटले आहेत तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाच्या यशानंतर जॉनने स्वत:ला खास गिफ्ट दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

'तू गौरव मोरेला सर बोल', त्या कमेंटमुळे अभिनय बेर्डे याला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

जॉन हा त्याच्या अॅक्शन सीन्ससोबतच बाईक प्रेमी म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक महागड्या बाईक आहेत. आता त्याने पठाणच्या यशानंतर स्वत:ला आणखी एक महागडी बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. जॉनने स्वत: ला सुझुकी हायाबुसा ही बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. या लाल रंगाच्या बाईकसोबतचा जॉनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकदा जॉन हा मुंबईच्या रस्त्यांवर बाईक घेऊन फिरताना दिसतो. आता त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी एक बाईक वाढली आहे.
वाचा: ‘नाटू नाटू’ गाण्यावर आनंद महिंद्रा यांचा डान्स, राम चरणने शिकवल्या स्टेप Video Viral

जॉनकडे यापूर्वी होंडा CBR1000RR-R, यामाहा YZF-R1, डुकाटी, बीएमडब्ल्यू S1000RR, अशा अनेक सुपरबाईक्स आहेत. आता सुझुकी हायाबुसा ही सुपरबाईक देखील त्याच्या बाइक कलेक्शनमध्ये अॅड झाली आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

विभाग

पुढील बातम्या