मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Godavari Teaser: परंपरा म्हणजे काय?; जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'चा टीझर प्रदर्शित

Godavari Teaser: परंपरा म्हणजे काय?; जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 05, 2022, 01:25 PM IST

    • Jitendra Joshi: या चित्रपटाने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. आता हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
गोदावरी (HT)

Jitendra Joshi: या चित्रपटाने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. आता हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

    • Jitendra Joshi: या चित्रपटाने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. आता हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवलेला चित्रपट म्हणचे 'गोदावरी.' आता हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपटाचा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

'गोदावरी' चित्रपटाच्या १ मिनिटे ३ सेकंदाच्या टीझरमध्ये जितेंद्र जोशीच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबाच्या नातेसंबंधातील चढउतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण टीझरमध्ये पाहायला मिळते. आता या कुटुंबाचे आणि 'गोदावरी'चे नक्की काय नाते आहे, हे सध्या गुलदस्त्यात असले तरी लवकरच याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.
वाचा : ऐश्वर्याच्या 'पीएस १'नं दसऱ्याआधीच लुटलं बॉक्सऑफिसवर सोनं; अवघ्या चार दिवसांत…

'गोदावरी' चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती जितेंद्र जोशीने केली आहे. तसेच दिग्दर्शन निखिल महाजनचे आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

इफ्फी महोत्सवात मोहोर उमटवलेल्या ' गोदावरी' चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लौकिक मिळवला आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपला झेंडा रोवला आहे. आता घरच्या प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झालेला 'गोदावरी' हा चित्रपट ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

विभाग

पुढील बातम्या