मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ponniyin Selvan: ऐश्वर्याच्या 'पीएस १'नं दसऱ्याआधीच लुटलं बॉक्सऑफिसवर सोनं; अवघ्या चार दिवसांत…

Ponniyin Selvan: ऐश्वर्याच्या 'पीएस १'नं दसऱ्याआधीच लुटलं बॉक्सऑफिसवर सोनं; अवघ्या चार दिवसांत…

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 04, 2022 01:35 PM IST

Ponniyin Selvan 1 box office day 4 collection: तमिळनाडूमध्ये 'पोन्नियिन सेलवन' हा तिसरा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन (HT)

शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी 'पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतात ४२ कोटी रुपये कमावले. तर जगभरात ८३ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. आता चित्रपटाने चार दिवसात किती कमाई केली हे समोर आले आहे.

'पोन्नियिन सेलवन' या चित्रपटाने चार दिवसात कमाईच्या बाबतील जगभरात २५० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरद्वारे चित्रपटाच्या कमाईबाबतील माहिती दिली आहे. 'चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चार दिवसाता २५० कोटी रुपयांची कमाई केली आहे' या आशयाचे ट्वीट रमेश बाला यांनी केले आहे.
वाचा : मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला

तमिळनाडूमध्ये 'पोन्नियिन सेलवन' हा तिसरा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली आहे. याआधी 'वलिमाई' आणि 'बीस्ट' या चित्रपटांनी कमाई केली आहे. शनिवारी 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाने ३४.६० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे दिसले. रविवारी चित्रपट कमाईच्या बाबतीत १०० कोटी रुपयांचा पल्ला पार करेल असे म्हटले जात होते. आता जगभरातील कमाई पाहाता चित्रपट ५०० कोटी रुपयांचा आकडा पार करणार असल्याचे म्हटले जात आहे.

पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिल, कन्नड़ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाण्यांना एआर रहमानने संगीत दिले आहे.

IPL_Entry_Point