मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter Collection Day 5: जगभरात 'फायटर'ची हवा! करणार २५० कोटी रुपयांचा पल्ला पार

Fighter Collection Day 5: जगभरात 'फायटर'ची हवा! करणार २५० कोटी रुपयांचा पल्ला पार

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 31, 2024, 12:46 PM IST

    • Fighter Box Office Collection Day 5: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोणचा 'फायटर' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.
Fighter Collection Day 5

Fighter Box Office Collection Day 5: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोणचा 'फायटर' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

    • Fighter Box Office Collection Day 5: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोणचा 'फायटर' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

Fighter Box Office Collection: 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा ‘फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादूकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. देशाच्या वायू दलाने केलेल्या कामगिरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता पाच दिवसात चित्रपटाने जगभरात तुफान कमाई केल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

'तू गौरव मोरेला सर बोल', त्या कमेंटमुळे अभिनय बेर्डे याला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

समोर आलेल्या माहितीनुसार, 'फायटर' चित्रपटाने जगभरात २५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी भारतात चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण झाली आहे. ही घसरण जवळपास ५० टक्के आहे. देशात चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी १३१.१० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे.
वाचा: रमेश देव यांच्यामुळे बिग बींना मिळाला होता सिनेमा, वाचा किस्सा

चित्रपटाच्या कमाईत ५० टक्के घसरण

'फायटर' हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी २२.५० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ४०.११ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी २८ कोटींहून अधिक गल्ला जमावला. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. चित्रपटाने २८.५ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी १९-२० कोटी रुपये कमावले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'फायटर'चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. ‘फायटर’चे डिजिटल अधिकार कोट्यावधींमध्ये विकले गेले असले, तरी त्यातून निर्मात्यांना नेमके किती पैसे मिळाले? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'फायटर' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ५६ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादूकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा आठवा चित्रपट आहे. व्हिजुअल इफेक्ट्स, कंप्यूटर ग्राफिक्स इमेजिंगमध्ये मास्टर आहे.

पुढील बातम्या