मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे रमेश देव. त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. त्यांनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळावी असा कधीही हट्ट त्यांनी केला नाही. आज ३० जानेवारी रोजी रमेश देव यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया बिग बी आणि त्यांच्यामध्ये असलेल्या खास नात्याविषयी...
रमेश देव यांनी मराठी चित्रपटांमध्ये नेहमी महत्त्वाची भूमिका साकारली. ते हिरोच्या भूमिकेत दिसले. हिंदीमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. पण तुम्हाला माहिती आहे का रमेश देव यांच्यामुळे अमिताभ बच्चन यांना चित्रपट मिळाला होता.
वाचा: स्वतःला चित्पावन ब्राह्मण म्हणत बीएमसी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारी केतकी चितळे होतेय ट्रोल!
जंजिर चित्रपटापूर्वी अमिताभ बच्चनचा पडता काळ होता. त्याचा एकही चित्रपट चालत नव्हता. त्यामुळे त्याला चित्रपट मिळणे कठीण झाले होते. अनेक चित्रपटांमधून बिग बींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अरविंद सेन दिग्दर्शित कसौटी या चित्रपटात देखील असेच काहीसे होणार होते. मात्र रमेश देव यांनी अरविंद सेन यांना समजावले. त्यामुळे अमिताभ यांना या चित्रपटात काम मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. कसौटी चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, प्राण आणि रमेश देव महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
२ फेब्रुवारी २०२२ साली रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता.