मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Genelia Dsouza: रितेशकडे पाहून मुरडलं होतं नाक; जिनिलियाने सांगितला होता पहिल्या भेटीचा किस्सा

Genelia Dsouza: रितेशकडे पाहून मुरडलं होतं नाक; जिनिलियाने सांगितला होता पहिल्या भेटीचा किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 05, 2023, 07:50 AM IST

    • Genelia Dsouza Birthday: रितेश देशमुख आणि जिनिलिया डीसूजा यांची पहिली भेट ही हैदराबाद विमानतळावर झाली होती.
Genelia Deshmukh

Genelia Dsouza Birthday: रितेश देशमुख आणि जिनिलिया डीसूजा यांची पहिली भेट ही हैदराबाद विमानतळावर झाली होती.

    • Genelia Dsouza Birthday: रितेश देशमुख आणि जिनिलिया डीसूजा यांची पहिली भेट ही हैदराबाद विमानतळावर झाली होती.

मराठी चित्रपटसृष्टी असो वा हिंदी सर्वांचे सध्याचे आवडते कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डीसूजा. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या वेड या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. मोठ्या पडद्यावर सर्वांची मने जिंकणाऱ्या रितेश आणि जिनिलियाची पहिली भेट नेमकी कुठे आणि कशी झाली ते जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

आज ५ ऑगस्ट रोजी जिनिलियाचा वाढदिवस आहे. रितेश आणि जिनिलियाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या पहिल्या चित्रपटापासूनच त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. पण जिनिलीया रितेशला भेटल्यावर तिचे त्याच्याबद्दलचे मत फार वेगळे होते. तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे गर्विष्ठ असेल असे तिला वाटले होते.
वाचा: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च नव्हे, तर ‘या’ चित्रपटातही शबाना आणि धर्मेंद्र झळकले एकत्र!

रितेश आणि जिनिलिया एका चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा एकत्र आले. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. त्यांची पहिली भेट हैदराबाद विमानतळावर झाली होती. रितेशला पाहाताच जिनिलियाने नाक मुरडले होते. कारण तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता. त्यामुळे तो गर्विष्ठ असेल असा जिनिलियाचा समज झाला होता. तिने रितेशकडे दुर्लक्ष केले आणि ते पाहून रितेशला जिनिलियाचे वागणे खटकले होते.

रितेशने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर जिनिलीयाने त्याच्याशी हात मिळविला. मात्र तिचं लक्ष इकडे-तिकडेच होते. खरंतर जिनिलीयाचे हे वागणे रितेशला काही पटले नव्हते. परंतु चित्रपटामुळे ते जसेजसे एकमेकांना समजू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही समजले नाही. शुटिंग संपल्यावर रितेश जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला सतत जिनिलियाची आठवण येऊ लागली होती. मात्र, एखाद्या अभिनेत्रीला काय सारखा फोन करायचा म्हणून रितेशने टाळले होते. दुसरीकडे जिनिलियाला देखील रितेशची आठवण येत होती.

पुढील बातम्या