मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Exclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला...

Exclusive: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला...

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 23, 2023, 03:08 PM IST

  • Rinku Rajguru: आकाश लवकरच 'घर बंदुक बिरयाणी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने आर्चीसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

आकाश ठोसर

Rinku Rajguru: आकाश लवकरच 'घर बंदुक बिरयाणी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने आर्चीसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Rinku Rajguru: आकाश लवकरच 'घर बंदुक बिरयाणी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने आर्चीसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली फ्रेश जोडी म्हणजे 'आर्ची' आणि 'परश्या.' आर्ची ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरुने साकारली तर परश्याच्या भूमिकेत आकाश ठोसर दिसला. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. आता आकाशने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

आकाश लवकरच 'घर बंदुक बिरयाणी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने आर्चीसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

'सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो बघून मी मजा घेत असतो. जे काही चाललं आहहे ते पाहून मी मजा घेत असतो. मला जे बोलायचं ते मी बोलत असतो. बाकी लोकांच्या गोष्टी सुरुच असतात. आम्ही दोघंही मजा घेत असतो बाकी असं काही विशेष नाही' असे आकाश ठोसर म्हणला.
वाचा: 'या' दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास

पुढे तो म्हणाला, 'आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आधूनमधून भेटत असतो. असेच फोटो व्हायरल करत रहा.' घर बंदुक बिरयाणी या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे.

ट्रेलरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे पार्श्वसंगीत आणि अभूतपूर्व ॲक्शन. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. यात प्रेमकहाणीही बहरत आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात. या चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे.लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेल्या या गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यश मिळाले आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

विभाग

पुढील बातम्या