मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dunki Teaser: शाहरुख चाहत्यांना सरप्राईज देणार! 'या' दिवशी रिलीज होणार 'डंकी'ची पहिली झलक

Dunki Teaser: शाहरुख चाहत्यांना सरप्राईज देणार! 'या' दिवशी रिलीज होणार 'डंकी'ची पहिली झलक

Oct 31, 2023, 08:58 AM IST

  • Dunki Teaser Release Date: 'डंकी' हा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे.

Dunki Teaser Release Date

Dunki Teaser Release Date: 'डंकी' हा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे.

  • Dunki Teaser Release Date: 'डंकी' हा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे.

Dunki Teaser Release Date: बॉलिवूड किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या वर्षातील 'डंकी' हा शाहरुखचा तिसरा चित्रपट असणार आहे. २०२३ या वर्षाची धमाकेदार सुरुवात शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटाने चांगलाच कल्ला केला. यानंतर आता प्रेक्षकांना 'डंकी' या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान आता शाहरुख खान याने चाहत्यांना सरप्राईज देण्याची तयारी केली आहे. लवकरच 'डंकी' या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

'डंकी' हा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आता सोशल मीडियावर 'डंकी'च्या टीझर रिलीजची तारीख चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खान आणि तापसी पन्नूच्या 'डंकी' या चित्रपटाबाबत बरीच चर्चा आहे. सोशल मीडियावर #DunkiTeaser ट्रेंडिंग सुरू झाला आहे. या चित्रपटाचा टीझर येत्या २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २ नोव्हेंबर हा शाहरुख खानचा वाढदिवस आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळीही शाहरुख आपल्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट म्हणून 'डंकी'चा टीझर रिलीज करणार असल्याचे बोलले जात आहे.

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या घरात अंकिताने सांगितला सुशांतसोबतच्या शेवटच्या भेटीचा किस्सा! म्हणाली...

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्वत: 'डंकी'चा टीझर लॉन्च करण्यासाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि या दिवशी तो टीझर रिलीज करणार आहे. सेन्सॉर बोर्डाने 'डंकी'च्या टीझरला यू सर्टिफिकेट दिल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या बातमीनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 'डंकी'ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने राजकुमार हिरानी फिल्म्स आणि जिओ स्टुडिओच्या सहकार्याने केली आहे.

शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील 'डंकी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 'डंकी' या चित्रपटामध्ये किंग खान एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. 'डंकी' हा चित्रपट २१ डिसेंबरला पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या