मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dunki Movie: कॉमेडियन सुनील पालचा रिव्ह्यू ऐकून होईल 'डंकी' बघण्याचा मोह! पाहा काय म्हणाला अभिनेता...

Dunki Movie: कॉमेडियन सुनील पालचा रिव्ह्यू ऐकून होईल 'डंकी' बघण्याचा मोह! पाहा काय म्हणाला अभिनेता...

Dec 21, 2023, 01:15 PM IST

  • Comedian Sunil Pal's Reaction On Dunki Movie: कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील 'डंकी' हा चित्रपट पाहिला आहे. 'डंकी' बघून चित्रपटगृहाबाहेर येताच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे.

Comedian Sunil Pal's Reaction On Dunki Movie

Comedian Sunil Pal's Reaction On Dunki Movie: कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील 'डंकी' हा चित्रपट पाहिला आहे. 'डंकी' बघून चित्रपटगृहाबाहेर येताच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे.

  • Comedian Sunil Pal's Reaction On Dunki Movie: कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील 'डंकी' हा चित्रपट पाहिला आहे. 'डंकी' बघून चित्रपटगृहाबाहेर येताच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे.

Comedian Sunil Pal's Reaction On Dunki Movie: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित 'डंकी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच शोला प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील 'डंकी' हा चित्रपट पाहिला आहे. 'डंकी' बघून चित्रपटगृहाबाहेर येताच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्याला 'डंकी' हा चित्रपट कसा वाटला आणि सगळ्यांनी हा चित्रपट का पाहायला हवा? हे सांगितलं आहे. त्यांनी या चित्रपटाचा दिलेला रिव्ह्यू ऐकून तर प्रत्येकालाच हा चित्रपट बघण्याची इच्छा होईल.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

सुनील पाल यांनी या चित्रपटाचं वर्णन करताना आपला भन्नाट अनुभव सांगितलं आहे. तर, हा चित्रपट ज्यांनी पाहिला नाही ते गाढव, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ‘खूप वर्षांनंतर एक चांगला चित्रपट आला आहे, ज्याचं नाव डंकी आहे. या चित्रपटातून राजकुमार हिरानी यांनी एक चांगला संदेश दिला आहे. एक राजकुमार तर दुसरा किंग खान, त्यामुळे हा एक राजा-महाराजांचा चित्रपट आहे. आणि या चित्रपटातून देण्यात आलेला संदेश असा आहे की, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा!’

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात पडली फूट; वाद पोहोचले घटस्फोटापर्यंत!

चित्रपटाच्या कथानकाविषयी सांगताना सुनील पाल म्हणाले, ‘तुम्ही लोक जे परदेशात जाऊन नोकरी मिळवण्यासाठी शिकत आहेत, तिकडे जाऊन एकदा बघा की काय अवस्था आहे लोकांची... ना तिथे लोकांना नोकरी मिळत ना इज्जत. आपली इज्जत वाचावी म्हणून ते इथे येऊन खोटं बोलतात आणि त्यांच्या बोलण्याला भुलून इथली लोकं तिथे जाण्याचं स्वप्न बघतात. त्यामुळे दुरून डोंगर साजरे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं.’

'डंकी' चित्रपट का बघावा हे सांगताना सुनील पाल म्हणाले की, 'एकत्र तुम्ही मसाला चित्रपट बघा किंवा असे सामाजिक संदेश देणारे चित्रपट. दोघांची तुलना होऊ शकत नाही. हा चित्रपट विशेषतः तरुणांनी बघायला हवा, जे विदेशात नोकरीची स्वप्न बघत आहेत. इथले लोक घरदार, आईवडील आणि कुटुंब सोडून तिकडे जातात आणि स्वतःचे हाल करून घेतात. हा चित्रपट आपल्या देशाची महानता सांगणारा आहे. यात आपल्या देशाचा विषय आहे, हेच डोक्यात ठेवून चित्रपट बघायला नक्की जा.'

पुढील बातम्या