Shivani Surve Relationship: 'वाळवी' या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे.
(1 / 6)
'वाळवी' या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. लवकरच अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. याला कारणीभूत ठरला आहे, तिने शेअर केलेला नवा व्हिडीओ...
(2 / 6)
शिवानी सुर्वे हिने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती साड्यांची खरेदी करताना दिसली आहे. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
(3 / 6)
अभिनेत्री शिवानी सुर्वे हि गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अजिंक्य ननावरे याला डेट करत आहे. अजिंक्य ननावरे देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.
(4 / 6)
अभिनेता अजिंक्य ननावरे हा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. या मालिकेतील त्याच्या 'अद्वैत' या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
(5 / 6)
अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे यांची पहिली भेट 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यांच्यात छान मैत्री झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
(6 / 6)
२०१५पासून शिवानी आणि अद्वैत दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. यावर्षी तरी ही जोडी लग्नबंधनात अडकेल, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.