मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: माझा नवरा मुस्लिम...; द केरळ स्टोरी पाहून प्रश्न विचारणाऱ्याला देवोलिनाचे सडेतोड उत्तर

The Kerala Story: माझा नवरा मुस्लिम...; द केरळ स्टोरी पाहून प्रश्न विचारणाऱ्याला देवोलिनाचे सडेतोड उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi

May 15, 2023, 11:06 AM IST

    • Devoleena Bhattacharjee: देवोलिनाने ट्विटर यूजरला चांगलेच सुनावले आहे.
Devoleena Bhattacharjee

Devoleena Bhattacharjee: देवोलिनाने ट्विटर यूजरला चांगलेच सुनावले आहे.

    • Devoleena Bhattacharjee: देवोलिनाने ट्विटर यूजरला चांगलेच सुनावले आहे.

चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक बडे कलाकार हा चित्रपट पाहताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर ट्वीट करणाऱ्या एका यूजरला चांगलेच सुनावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

एका यूजरने 'माझ्या एका मैत्रीणाचा बॉयफ्रेंड दुसऱ्या धर्माचा आहे. तिने अगदी सहज त्याला द केरळ स्टोरी सिनेमा पाहायला जायचं का विचारले. त्यावर त्याने नकार तर दिलासोबतच तिला इस्लामोफोबिक असल्याचा अरोपही केला. ती घाबरली आणि तिने जर मी इस्लामोफोबिक आहे तर मुस्लिमला डेट केले नसते असे म्हणाली. त्यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणाला, धर्मांतर करुन माझ्याशी लग्न कर. तेव्हा ती तयार झाली. पण सिनेमा मात्र पाहून आली. त्यानंतर तिने तिचा निर्णय बदलला. बॉयफ्रेंडसोबत असलेले नाते तिने तोडले. चित्रपटाचा हा परिणाम सर्वांना दिसत आहे म्हणून अनेकजण त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत' असे म्हटले.
वाचा: 'द केरळ स्टोरी'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, कमावले इतके कोटी

काही दिवसांपूर्वी देवोलिनाने जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले. तिचा पती मुस्लिम असल्याचे म्हणत देवोलिनाने यूजरला उत्तर दिले आहे. 'असे सर्वांसोबत घडतेच असे नाही. माझा नवरा मुस्लिम आहे आणि त्याने माझ्यासोबत सिनेमा पाहिला. त्याने चित्रपटाची स्तुती देखील केली. त्याने एकही आक्षेपार्ह शब्द वापरला नाही. मला असे वाटते प्रत्येक भारतीयाने असे वागायला हवे' या आशयाचे ट्वीट देवोलिनाने केले आहे.

विभाग

पुढील बातम्या