मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepali Sayyad: तिच्या हिंमतीला माझा सलाम; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात दीपाली सय्यदची उडी

Deepali Sayyad: तिच्या हिंमतीला माझा सलाम; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात दीपाली सय्यदची उडी

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 11, 2023, 05:26 PM IST

    • Urfi Javed: उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये दीपाली सय्यद यांनी उडी घेतली आहे.
दीपाली सय्यद (HT)

Urfi Javed: उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये दीपाली सय्यद यांनी उडी घेतली आहे.

    • Urfi Javed: उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये दीपाली सय्यद यांनी उडी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ते पाहून उर्फी देखील शांत बसली नाही. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना चांगलेच सुनावले. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादात अनेकांनी उडी घेतली. आता भिनेत्री दीपाली सय्यद यांनी त्यांचे मत मांडले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

दीपाली सय्यद यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी, सोशल मीडिया आपण कसा वापतो? आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपण कोणत्या थरापर्यंत पोहोचतो हे एकदा पाहायला हवे. सोशल मीडियालाही बंधने असायला हवीत. उर्फी उदरनिर्वाह करण्यासाठी या सर्व गोष्टी करत आहे. रस्त्यावर उभे राहून फोटो काढण्याची तिला परवानगी मिळाली आहे का? तशी उर्फी जावेदकडे असेल तर तिला बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. पण परवानगी न घेता अशाप्रकारचे कपडे परिधान करून जर उर्फी रस्त्यावरच शूट करत असेल तर ते चुकीचे आहे असे दीपाली सैय्यद म्हणाल्या.
वाचा: उर्फी जे करतेय त्यात मला काही चुकीचं वाटत नाही; अमृता फडणवीस यांची बिनधास्त भूमिका

पुढे त्या म्हणाल्या, सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालू नयेत. शॉर्ट्स, टी-शर्ट, फ्रॉक परिधान यात फरक असतो. उर्फी जे कपडे परिधान करते ते ट्रान्सपरन्ट असतात किंवा कोणी घालू शकत नाही असे असतात. उर्फीची जी हिंमत आहे त्याला मझा सलाम. पण त्याच हिंमतीचा वापर ती वेगळ्या पद्धतीने करेल ती खूप मोठी होईल. आज सर्वांच्या तोंडात उर्फीचे नाव आहे. तिला जी प्रसिद्धी मिळाली आहे तिने त्याचा योग्य वापर करावा.

विभाग

पुढील बातम्या