मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dahaad Review: ओटीटीवरही दिसली सोनाक्षी सिन्हाची ‘दबंग’गिरी! वाचा कशी आहे ‘दहाड’ वेब सीरिज...

Dahaad Review: ओटीटीवरही दिसली सोनाक्षी सिन्हाची ‘दबंग’गिरी! वाचा कशी आहे ‘दहाड’ वेब सीरिज...

May 12, 2023, 11:23 AM IST

  • Sonakshi Sinha Starrer Dahaad Review: या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये सोनाक्षीसोबत विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोनम शाह मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

Dahaad

Sonakshi Sinha Starrer Dahaad Review: या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये सोनाक्षीसोबत विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोनम शाह मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

  • Sonakshi Sinha Starrer Dahaad Review: या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये सोनाक्षीसोबत विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोनम शाह मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

Sonakshi Sinha Starrer Dahaad Review: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ‘दहाड’ या वेब सीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये सोनाक्षीसोबत विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोनम शाह मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ‘दहाड’ या वेब सीरिजचे एकूण ८ भाग प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

ट्युमरने त्रस्त असलेल्या राखी सावंतला मिळाली जीवे मारण्याची धमकी; तरीही तक्रार केली नाही! कारण काय?

शाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! 'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या खास शुभेच्छा!

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये रितेशचं वेलकम, पण महेश मांजरेकर हवेच होते! प्रेक्षकांच्या कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर!

‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

काय आहे कथानक?

‘दहाड’ ही राजस्थानच्या मांडवा शहरातील एका पोलीस स्टेशनची ही गोष्ट आहे. एक असहाय भाऊ मांडवा पोलीस ठाण्यात आपल्या बहिणीच्या हरवल्याची तक्रार घेऊन येतो, पण ती मुलगी असल्याने पोलीस प्रकरण फार तपास न करताच बंद केले जाते. मात्र, आपल्या बहिणीच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या दबावामुळे मुस्लिम मुलाचे आणि ठाकूरच्या मुलीचे प्रकरण सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जेव्हा या भावाने पाहिले, तेव्हा तोही म्हणतो की त्याची बहीण एका मुस्लिमासोबत पळून गेली आहे.

धर्माचा विचार करून त्या मुलाच्या बहिणीचे प्रकरणही राजकारण्याच्या सांगण्यावरून उघडले जाते. दोन्ही प्रकरणांची जबाबदारी एसआय अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा), कैलाश पारघी (सोहम शाह) आणि अधिकारी देवीलाल सिंह (गुलशन देवय्या) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. धर्मावरून सुरू झालेले हे प्रकरण असे वळण घेते की, सगळेच चक्रावून जातात. यानंतर २७ मुलींची हत्या करणार्‍या सीरियल किलरचा मांडवा पोलिस पथक कसा पर्दाफाश करते, आणि हा सिरीयल किलर आनंद स्वर्णकर (विजय वर्मा) या मुलींची हत्या का करतो, हे थरारक कथानक जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज एकदा पाहावी लागणार आहे.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

सोनाक्षी सिन्हाने ‘अंजली भाटी’ची व्यक्तिरेखा खूप छान साकारली आहे. राजस्थानी स्टाईलमध्ये बोलण्याचा टोन असो किंवा पोलिस अधिकाऱ्याची देहबोली असो, सोनाली या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसते. तिच्या दमकदार अभिनयाने अंजली भाटीच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणला आहे. विजय वर्माने त्याच्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा सगळ्यांना घाबरवले आहे. आनंद स्वर्णकर आणि अंजली भाटी यांच्यातील लढत अतिशय मनोरंजक आहे.

या वेब सीरिजमध्ये अभिनेता गुलशन देवैयाने प्रामाणिक पोलीस अधिकारी देवीलाल सिंहची भूमिका साकारली आहे. तर, सोहम शाह यात एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. अभिनयाच्या बाबतीत सगळेच कलाकार आपापल्या भूमिकेत उत्तम दिसले आहेत. संवादापासून देहबोलीपर्यंत सगळ्याच बाबतीत ही पात्रं प्रेक्षकांना प्रभावित करतात.

का बघाल ही वेब सीरिज?

‘दहाड’च्या ट्रेलरमध्येच निर्मात्यांनी खुन्याचा खुलासा केला होता. क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये खुनी कोण आहे, हे नेहमी शेवटी उलगडते. परंतु, यात मात्र आधीच याचा खुलासा करण्यात आला आहे. शांत स्वभावाचा संयमीपणाने वागणारा सुशिक्षित प्राध्यापक अशा प्रकारे खून का करतो, हे पाहण्यासाठी सीरिज शेवटपर्यंत बघणे मनोरंजक ठरते.

वेब सीरिज: दहाड

दिग्दर्शक: रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय

कलाकार: सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवैया, सोहम शाह

कुठे पहाल?: प्राईम व्हिडीओ

स्टार: ३.५

पुढील बातम्या