मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dadasaheb Phalke Award: सौंदर्यवती रेखाचा हात धरून दादासाहेब पुरस्कार सोहळ्यात पोहोचली आलिया! पाहा video

Dadasaheb Phalke Award: सौंदर्यवती रेखाचा हात धरून दादासाहेब पुरस्कार सोहळ्यात पोहोचली आलिया! पाहा video

Feb 21, 2023, 11:31 AM IST

  • Dadasaheb Phalke Award 2023: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळ्यातील आलिया भट्ट आणि रेखा या दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Alia And Rekha

Dadasaheb Phalke Award 2023: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळ्यातील आलिया भट्ट आणि रेखा या दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • Dadasaheb Phalke Award 2023: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळ्यातील आलिया भट्ट आणि रेखा या दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Dadasaheb Phalke Award 2023: भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार अर्थात 'दादासाहेब फाळके पुरस्कार’ नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडचे दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेते अनुपम खेर, 'कंतारा' फेम अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, अभिनेत्री रश्मी देसाई, अभिनेता वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, यावेळी सगळ्यांच्या नजरा आलिया भट्ट आणि रेखा यांच्यावर खिळल्या होत्या. रेखा आणि आलिया या सोहळ्यात एकमेकींसोबतच दिसल्या.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ अवॉर्डमधील आलिया भट्ट आणि रेखा या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा साडीतील लूक सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट पांढऱ्या साडीमध्ये अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिने कानात घातलेले सिल्वर कानातले आणि छोटीशी बिंदी या अभिनेत्रीच्या लूकचा चारचांद लावत आहे. याशिवाय रेखा नेहमीप्रमाणेच या पुरस्कार सोहळ्यात देखील केसांमध्ये गजरा, कानातले आणि कांजीवरम साडी परिधान करून सुंदर दिसल्या आहेत. यावेळी आलिया रेखाचा हात धरून या पुरस्कार सोहळ्यात येताना दिसली.

दोघींनी या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवॉर्ड्ससोबत भरपूर फोटो पोजही दिल्या. आलिया भट्ट पुरस्कार स्वीकारण्यासाठी या सोहळ्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर आलियाचा पती अभिनेता रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुढील बातम्या