मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehzada Collection: ‘पठाण’ समोर ‘शहजादा’ झाला बेहाल! चौथ्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई

Shehzada Collection: ‘पठाण’ समोर ‘शहजादा’ झाला बेहाल! चौथ्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2023 10:55 AM IST

Shehzada Box Office Collection Day 4: रिलीजच्या चार दिवसांत या चित्रपटाने अवघ्या २२ कोटींची कमाई केली आहे. तर, वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर देखील सध्या हीच परिस्थिती दिसतेय.

Shehzada Box Office Collection
Shehzada Box Office Collection

Shehzada Box Office Collection Day 4: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘शहजादा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. मात्र, सध्या बॉक्स ऑफिसवरची कमाई पाहता हा चित्रपट आपली फारशी जादू दाखवू शकलेला नाहीये. ‘शहजादा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ तब्बल १५ दिवस उलटून गेल्यानंतर देखील आपलं स्थान टिकवून आहे. या चित्रपटासमोर इतर चित्रपटांनी मात्र गुडघे टेकले आहेत.

‘शहजादा’च्या कमाईची सुरूवात तशी संथ होती. मात्र, कमाईचा आकडा अद्यापही वाढलेला नाही. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ६ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६.६५ कोटी, तर तिसऱ्या दिवशी ७ कोटींची कमाई केली होती. मात्र, चौथ्या दिवशी या चित्रपटाला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने अवघ्या २.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रिलीजच्या चार दिवसांत या चित्रपटाने अवघ्या २२ कोटींची कमाई केली आहे. तर, वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर देखील सध्या हीच परिस्थिती दिसतेय. वर्ल्डवाईडमध्ये देखील या चित्रपटाने २७ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत या चित्रपटाने ‘पठाण’ पुढे गुडघे टेकले आहेत. शाहरुख खानचा चित्रपट पठाण बॉक्स ऑफिसवर सातत्याने यश मिळवत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेले यश पाहून ‘शहजादा’ कार्तिक आर्यनने आपल्या चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलली होती.

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ देशभरात ३००० हजारांहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. 'भूल भुलैया २'च्या यशानंतर कार्तिककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. हॉलिवूड चित्रपट ‘अँटमॅन ३‘ने ‘शहजादा’पेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करणाऱ्या कार्तिक आर्यनने तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचाही काहीसा परिणाम या कलेक्शनवर झाला आहे.

IPL_Entry_Point